वसई- विरार शहरात 4 जणांचा मृत्यू; दिवसभरात फक्त 52 नवे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 20:50 IST2020-08-25T20:50:32+5:302020-08-25T20:50:37+5:30
वसई विरार शहराची कोरोना मुक्तिकडे वाटचाल

वसई- विरार शहरात 4 जणांचा मृत्यू; दिवसभरात फक्त 52 नवे रूग्ण
वसई : वसई विरार शहरात मंगळवारी दिवसभरात 4 रुग्णाचा मृत्यू झाला असून ही बाब चिंतेची आहे. तरी दिवसभरात फक्त 52 नवे रूग्ण आढळून आले व सर्वाधिक असे 208 रूग्ण मुक्त झाल्याची माहिती महापालिकेने दिली.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका हद्दीत आता एकूण रूग्ण संख्या 15 हजार 931 वर पोहोचली आहे. तर शहरात आतापर्यंत एकूण मुक्त रूग्णसंख्या 13 हजार 661 इतकी झाली आहे. तर महापालिका हद्दीतील मृतांची संख्या आता एकूण 334 वर पोहचली असून शहरात विविध रुग्णालयात आता केवळ 1 हजार 936 रूग्ण उपचार घेत असल्यामुळे आता ही आकडेवारी वसई विरार शहराला कोरोना मुक्तीकडे नेत असल्याचे संकेत दिसत आहेत.