शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना रॅगिंगद्वारे अमानुष मारहाण; विद्यार्थ्यांना गंभीर इजा, विद्यालय प्रशासनाचे मात्र ‘नरो वा कुंजरो वा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 15:17 IST

यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला गंभीर इजा झाली असून, सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनास कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याबाबत पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पालघर : वडराई-शिरगाव रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या केंद्राच्या जवाहर नवोदय विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीतील ३५ विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रूपात मारहाण करून रॅगिंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला गंभीर इजा झाली असून, सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनास कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याबाबत पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

वडराईतील नवोदय विद्यालयात  दि. ३० सप्टेंबर रोजी अकरावीतील सहा-सात विद्यार्थ्यांनी रात्री ११ वाजता विद्यालयातील उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत म्हणून बोलावण्यात आले. उशिराने आलेल्या विद्यार्थ्यांना उभे करून त्यांच्या कानावर विद्यार्थ्यांचा गुप्तांगावर मारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

कानावर मारले ७-८ ठोसे- एका विद्यार्थ्यांचा कान जास्त दुखू लागल्याने विद्यालयातील परिचारिकेकडे नेले असता, कानाला झालेली दुखापत बघून मुलांच्या आई-वडिलांना बोलावून घ्या व डॉक्टरांकडे त्याची तपासणी करा, असे सांगण्यात आले. 

- यावेळी विद्यार्थ्याला जास्त दुखापत झाल्याने हा प्रकार मारहाणीतून झाला आहे का? प्रश्न डॉक्टरांनी उपस्थित केला असता, हा प्रकार उघड होत पालकांना कळले. निखिल सिंग यांच्या कानावर सात ते आठ वेळा मारण्यात आले असून, त्याचा कानाचा पडदा फाटण्याची भीती व्यक्त केली आहे. औषधोपचार सुरू असून, जर सुधारणा झाली नाही तर सध्यातरी यावर शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे त्याचे पालक नेपाल सिंग यांनी सांगितले.

नाकातून रक्त येईपर्यंत मारहाणविशाल कुशवाह व सुशांत सोनकर या विद्यार्थ्यांच्या गालावर आठ ते नऊ वेळा जोरजोरात मारण्यात आले. यात विशालचा कान सुजला होता. तर सुशांत सोनकर त्याच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. कौस्तुभ मोरे यालाही जबर मारहाण करण्यात आल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, अहवाल प्राप्त झाल्यास दोषी विद्यार्थ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल.- जॉन इब्राहम, प्राचार्य, जवाहर जवाहर नवोदय विद्यालय, पालघर

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक