शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मोखाड्यात ३२७ बालके कुपोषित; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:29 PM

५३ बालके मृत्यूच्या उंबरठयावर

- रविंद्र साळवेमोखाडा : मुंबईपासून १०० किमी अंतरावर वसलेल्या मोखाडा तालुक्याची पाठ कुपोषण आजतागायत सोडायला तयार नाही. ही बाब जूनमध्ये स्पष्ट झाली असून या तालुक्यात ३२७ कुपोषित असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर ५३ मृत्यूच्या उंबरठयावर आहेत.पावसाळ्यातील शेतीच्या लावणीची कामे आटोपल्यानंतर आॅगस्ट अखेरी पासून आदिवासी बांधवांच्या हाताला काम नसल्याने कुपोषणात वाढ होऊन बालमुत्यूची समस्या उद्भवते कुपोषणाचा थेट संबंध रोजगाराशी निगडीत असूनही रोजगाराच्या यंत्रणा आदिवासींच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहेत.एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंतर्गत १७८ मूळ अंगणवाड्या व ५१ मिनी अंगणवाडया असून ३२७ बालके कुपोषणाच्या विळख्यात आहेत. जून मध्ये २ बालमृत्यू झाले असून ५३ बालके एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारी नुसार मुत्यूच्या उंबरठ्यावर असल्याने पुन्हा कुपोषणाचे बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मोखाडा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या बºयाच अंगणवाडयाना स्वतंत्र इमारत नाही. आहार, स्वच्छ पेयजल सुविधा, शौचालय आदी बाबी एकात्मिक प्रकल्प कार्यालयाशी निगडीत आहेत परंतु हे विभाग कुपोषण निर्मूलनात अपयशी ठरत असून मोखाडा तालुका कुपोषणाने ग्रस्त असून देखील येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग व बालरोग तज्ञ लाभलेले नाहीत.मोखाड्यात काय घडते आहे नेमकेरोहयो आणि नरेगा या दोन रोजगार निर्मितीच्या योजना असल्या तरी त्याची अंमलबजावणी प्रशासन धड करत नसल्याने येथील आदिवासींवर बेरोजगारीची पाळी दरवर्षी ओढावते. त्यातून रोजगाराबरोबरच स्थलांतर आणि कुपोषणाची स्थिती देखील उद्भवत असते. तरी त्याबाबात कोणतीही कारवाई होत नाही.पोषक आहारासाठी सामग्री पुरविणाºयांची बीले वेळेवर दिली न गेल्याने हा आहारही निकृष्ट होतो किंव्हा खंडीत होत असतो त्याचाही परिणाम होतो.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHealthआरोग्य