मोखाड्यात ३२७ बालके कुपोषित; दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 06:58 IST2018-07-26T23:29:28+5:302018-07-27T06:58:13+5:30
५३ बालके मृत्यूच्या उंबरठयावर

मोखाड्यात ३२७ बालके कुपोषित; दोघांचा मृत्यू
- रविंद्र साळवे
मोखाडा : मुंबईपासून १०० किमी अंतरावर वसलेल्या मोखाडा तालुक्याची पाठ कुपोषण आजतागायत सोडायला तयार नाही. ही बाब जूनमध्ये स्पष्ट झाली असून या तालुक्यात ३२७ कुपोषित असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर ५३ मृत्यूच्या उंबरठयावर आहेत.
पावसाळ्यातील शेतीच्या लावणीची कामे आटोपल्यानंतर आॅगस्ट अखेरी पासून आदिवासी बांधवांच्या हाताला काम नसल्याने कुपोषणात वाढ होऊन बालमुत्यूची समस्या उद्भवते कुपोषणाचा थेट संबंध रोजगाराशी निगडीत असूनही रोजगाराच्या यंत्रणा आदिवासींच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहेत.
एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंतर्गत १७८ मूळ अंगणवाड्या व ५१ मिनी अंगणवाडया असून ३२७ बालके कुपोषणाच्या विळख्यात आहेत. जून मध्ये २ बालमृत्यू झाले असून ५३ बालके एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारी नुसार मुत्यूच्या उंबरठ्यावर असल्याने पुन्हा कुपोषणाचे बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मोखाडा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या बºयाच अंगणवाडयाना स्वतंत्र इमारत नाही. आहार, स्वच्छ पेयजल सुविधा, शौचालय आदी बाबी एकात्मिक प्रकल्प कार्यालयाशी निगडीत आहेत परंतु हे विभाग कुपोषण निर्मूलनात अपयशी ठरत असून मोखाडा तालुका कुपोषणाने ग्रस्त असून देखील येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग व बालरोग तज्ञ लाभलेले नाहीत.
मोखाड्यात काय घडते आहे नेमके
रोहयो आणि नरेगा या दोन रोजगार निर्मितीच्या योजना असल्या तरी त्याची अंमलबजावणी प्रशासन धड करत नसल्याने येथील आदिवासींवर बेरोजगारीची पाळी दरवर्षी ओढावते. त्यातून रोजगाराबरोबरच स्थलांतर आणि कुपोषणाची स्थिती देखील उद्भवत असते. तरी त्याबाबात कोणतीही कारवाई होत नाही.
पोषक आहारासाठी सामग्री पुरविणाºयांची बीले वेळेवर दिली न गेल्याने हा आहारही निकृष्ट होतो किंव्हा खंडीत होत असतो त्याचाही परिणाम होतो.