शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या उत्तन भागात बोगस डॉक्टरच्या उपचारात ३२ वर्षीय मच्छीमाराचा बळी

By धीरज परब | Updated: September 3, 2025 21:16 IST

लोकांच्या संताप नंतर पालिकेची गुन्हा दाखल करण्याची तर पोलिसांची चौकशीची कार्यवाही

धीरज परब

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड- भाईंदरच्या उत्तन नाका येथे रुग्णालय, दवाखाना, रक्त तपासणी आदी थाटून लोकांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टर मुळे एका ३२ वर्षीय मच्छीमाराचा मृत्यू झाल्याचा तसेच पोलीस आणि महापालिकेने तात्काळ कारवाई न केल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला. त्या नंतर पालिकेने त्या बोगस डॉक्टर विरुद्ध उत्तन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही तर पोलिसांनी देखील चौकशी सुरु केली आहे. 

उत्तनच्या नवीखाडी भागात राहणार  ग्लेस्टन गिल्बर्ट घोन्साल्विस ह्या ३२ वर्षीय मच्छीमारास बरे वाटत नव्हते म्हणून करईपाडा येथील उत्तन चॅरिटेबल ट्रस्ट दवाखान्यात सोमवारी गेला होता. स्वतःला डॉक्टर म्हणवणाऱ्या फय्याज आलम ह्याने औषधे दिली व रक्त तपासणी करण्यास सांगून सायंकाळी पुन्हा बोलावले. सायंकाळी ग्लेस्टन गेल्या नंतर त्याला इंजेक्शन सलाईन द्वारे दिले गेले. त्यानंतर अर्ध्यातासातच ग्लेस्टनची प्रकृती बिघडली व प्रचंड थंडीताप आला. 

त्याना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. चांगला धडधाकट व तरुण असलेल्या ग्लेस्टनच्या ह्या दुर्दैवी मृत्यू  मुळे मच्छीमार व नातलग संतप्त झाले. नातलग व मच्छीमारांनी पोलिसांना तक्रार करत फय्याज वर कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले असा आरोप होत आहे. 

मंगळवारी परिसरातील सातत्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटनां प्रकरणी मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी पालिकेत तक्रार करत कारवाईची आणि आरोग्य मोहीमची मागणी केली.  बुधवारी स्थानिक माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, मनसेचे संदीप राणे सह मच्छीमारांनी उत्तन पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ निरीक्षक शिवाजी नाईक यांना तक्रार देत तात्काळ गुन्हा दाखल करून फय्याज ह्याला अटक करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला. 

ह्या नंतर मीरा भाईंदर महापालिका प्रशासन जागे झाले व फय्याज याची कोणतीच नोंदणी पालिकेत नसल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे पत्र उत्तन भागातील पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पाडवी यांना देण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा फय्याज विरुद्ध डॉ. पाडवी फिर्याद देण्याची कार्यवाही करत होते. तर उत्तन पोलिसांनी देखील आता याची चौकशी सुरु केली आहे.  

फय्याज ह्याने उत्तन नाका येथे २ मजली इमारत भाड्याने घेऊन रुग्णालय सुमारे अडीज - तीन महिन्या पासून सुरु केले होते. करईपाडा येथे देखील दवाखाना थाटला होता. परंतु पालिके कडे नोंदणी केली नव्हती. भर वस्तीत वर्दळीच्या ठिकाणी फय्याज आलम ह्याने दोन्ही ठिकाणी दवाखाना, रुग्णालय चालवत होता. दोन्ही ठिकाणी फलकावर त्याने स्वतःचे नाव व डिग्री नमूद केली नव्हती. तरी देखील महापालिकेने वेळीच ठोस कारवाई केली नाही. पालिकेने वेळीच कठोर कारवाई केली असती तर ग्लेस्टनचा जीव वाचला असता. त्यामुळे पोलिसांसह पालिका अधिकाऱ्यांवर पण कारवाईची, सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टर