मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना महावितरणची २७ लाख भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:18 IST2019-07-15T00:18:31+5:302019-07-15T00:18:39+5:30
विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यूमुखी पडलेल्या नानासाहेब शहाजी हुलगुंडे (४२) या या कर्मचा-याच्या कुटुंबियांना महावितरणने २७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देऊन त्याच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावूनही घेतले जाणार आहे.

मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना महावितरणची २७ लाख भरपाई
नालासोपारा : गास गावात विजेची तुटलेली तार जोडण्यासाठी खांबावर चढताना विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यूमुखी पडलेल्या नानासाहेब शहाजी हुलगुंडे (४२) या या कर्मचा-याच्या कुटुंबियांना महावितरणने २७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देऊन त्याच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावूनही घेतले जाणार आहे.
ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर ही बाब राज्याचे मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालघर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या निदर्शनास आणून देऊन राज्य शासनाने याप्रकरणी मृत कर्मचाºयाच्या वारसास तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजपचे स्थानिक नेते शेळके यांनी केली होती. ही बाब राज्यसभेचे खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते डॉ. विकास महात्मे यांच्या निदर्शनास आणून देत त्यांचेही सहकार्य मिळवले होते. या प्रकरणी ऊर्जा मंत्र्यांनी सहकार्य केले होते.
कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडलेल्या महावितरण कर्मचाºयाच्या कुटुंबियांना आतापर्यंत २७ लाखांची नुकसानभरपाई अदा करण्यात आली असून त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. या कर्मचाºयाच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या तीव्रता थोडीशी का होईना पण कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांत समाधान व्यक्त होते आहे.