२ लाख २४ हजार ४०० रुपयांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 06:06 IST2018-10-21T06:06:29+5:302018-10-21T06:06:31+5:30

मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोळ टोल नाका येथे शनिवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास २ लाख २४ हजार ४०० किंमतीचा विमल गुटखा कासा पोलीसांनी पकडला आहे.

2 lakh 24 thousand 400 rupees gutka caught | २ लाख २४ हजार ४०० रुपयांचा गुटखा पकडला

२ लाख २४ हजार ४०० रुपयांचा गुटखा पकडला

डहाणू : मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोळ टोल नाका येथे शनिवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास २ लाख २४ हजार ४०० किंमतीचा विमल गुटखा कासा पोलीसांनी पकडला आहे.
या कारवाईत ३९ हजार ६०० रुपये किंमतीचे तंबाखु पान मसाला २४ बॅग, २ लाख ५० हजार किंमची सिल्व्हर अल्टो गाडी कार आणि १ लाख २० हजार किंमतीचे २०० किलो वजनाचे विमल सुगंधी पानमसाल्याच्या ६ गोणींमध्ये सुटा माल पकडला आहे. या प्रकरणी एकुण ११ लाख ४६ हजार रु पये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कासा पोलीसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. स.पो.नि. प्रकाश सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Web Title: 2 lakh 24 thousand 400 rupees gutka caught