नालासोपारा : अंगातले कथित भूत उतरविण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शुक्रवारी विरारमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी विरार पोलिसांनी २२ वर्षीय भोंदूबाबासह त्याच्या मित्राला अटक केली आहे.
पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. मंदिरात गेल्यावर तिला अस्वस्थ वाटायचे. दरम्यानच्या काळात ही मुलगी जादूटोणा, भूतबाधा उतरवण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाच्या संपर्कात आली. 'तुझ्या अंगात भूत असून, ते उतरविण्यासाठी माझ्याशी शरीरसंबंध करावे लागतील', असे त्याने मुलीला सांगितले. त्यानुसार, ३० जुलै रोजी भोंदूबाबा आणि त्याचा मित्र मुलीला नालासोपारा येथील राजोडी परिसरातल्या एका लॉजमध्ये घेऊन गेले. भोंदूबाबाने जुलै ते ऑगस्टदरम्यान मुलीवर अनेकदा अत्याचार केले.
नालासोपारा येथील राजोडी परिसरातल्या एका लॉजमध्ये घेऊन गेले. भोंदूबाबाने जुलै ते ऑगस्टदरम्यान मुलीवर अनेकदा अत्याचार केले.