वाड्यातील विकास कामांसाठी १५० कोटी मंजूर - सवरा

By Admin | Updated: May 4, 2016 00:58 IST2016-05-04T00:58:10+5:302016-05-04T00:58:10+5:30

गेल्या दोन वर्षांत वाडा तालुक्यातील रस्ते, पूल आदी विकास कामांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा

150 crores sanctioned for development works in the Wad - Sawra | वाड्यातील विकास कामांसाठी १५० कोटी मंजूर - सवरा

वाड्यातील विकास कामांसाठी १५० कोटी मंजूर - सवरा

वाडा : गेल्या दोन वर्षांत वाडा तालुक्यातील रस्ते, पूल आदी विकास कामांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे दिली.
गो-हे विभागात मंजूर झालेल्या अनेक कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. कुडूस - कंचाड रस्त्यासाठी (३ कोटी) हमरापूर -गुहीर - गालतरे - गो-हे (३ कोटी ५०) लाख, आमगाव - ब्राम्हणगाव - सावरोली ( ५० लाख) कंचाड - ब्राह्मणगाव - पाचमाड ( १ कोटी ५० लाख ) या कामांचे भूमिपूजन आज त्या त्या ठिकाणी करण्यात आले. तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी आग्रही राहीन असे प्रतिपादन त्यांनी कंचाड येथे झालेल्या कार्यक्र मात केले.
यावेळी वाडा पंचायत समितीचे सभापती अरूण गौंड, उपसभापती नंदकुमार पाटील, तालुकाध्यक्ष संदिप पवार, जिल्हा नेते राजेश पाटील, राजू दळवी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 150 crores sanctioned for development works in the Wad - Sawra