- मंगेश कराळे नालासोपारा - भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांनीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वसईच्या गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर हा अपघात घडला. शाहीस्ता शहा (१४) असे या अपघात मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे.
वसईच्या पापडी परिसरात राहणारी शाहिस्ता शहा उर्दू शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्या नंतर रस्त्यावरून जात असताना संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या समोर भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत शाहीरन गंभीर जखमी झाली. मात्र दुचाकीस्वार दुचाकी घटनास्थळी टाकून पसार झाला. रोहित जाधव असे या दुचाकीस्वाराचे निष्पन झाले असून वसई पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताच्या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
दुचाकीस्वाराची दुचाकी ताब्यात घेऊन दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.- बाळकृष्ण घाडीगावकर, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे)