वसईत चौधरीकुलाच्या १२व्या वंशजांचा मेळावा
By Admin | Updated: March 22, 2017 01:13 IST2017-03-22T01:13:46+5:302017-03-22T01:13:46+5:30
विरार शहरातील आद्य पुरुष जरसू चौधरी कुटुंबियांच्या १२ व्या वंशांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.

वसईत चौधरीकुलाच्या १२व्या वंशजांचा मेळावा
वसई : विरार शहरातील आद्य पुरुष जरसू चौधरी कुटुंबियांच्या १२ व्या वंशांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत तब्बल २५० कुटुंबे उपस्थित होते.
स्व. मधुसूदन चौधरी यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून शरद मधुसूदन चौधरी यांनी चौधरी कुटुंबिय वंशावळ स्नेहमेळावा आयोजित केला होता. चौधरी कुटुंबात आतापर्यंत माजी आमदार स्व. पंढरीनाथ चौधरी यांच्यापासून काही माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी नगरसेवक लाभले आहेत. कुटुंबातील विद्यमान नगरसेविका चिरायू चौधरी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर प्रत्येकाने आपला परिचय करून दिला. याप्रसंगी स्व. मधुसूदन चौधरी यांच्या अर्धपुतळ््याचे अनावरण त्यांचे जावई लक्ष्मण वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चौधरी परिवार वंशावळ पुस्तिकेचे प्रकाशन मधुकर चौधरी, अनिल वर्तक, मीना अ. चौधरी आणि मीना भा. चौधरी यांनी केले. जयप्रकाश चौधरी यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)