12th Pass Job: बारावी पास उमेदवारांसाठी महानगरपालिकेत नोकरी, दरमहा ७५ हजार पगार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:34 IST2025-05-28T17:33:23+5:302025-05-28T17:34:54+5:30
Vasai Virar Municipal Corporation Recruitment: सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

12th Pass Job: बारावी पास उमेदवारांसाठी महानगरपालिकेत नोकरी, दरमहा ७५ हजार पगार!
सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. वसई विरार महापालिकेत बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मेगा भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत रिक्त पदांच्या १०० हून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून ५ जून २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाही, असे वसई विरार महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
या भरती अंतर्गत वसई विरार महापालिकेत आरोग्य विभागाच्या बालरोग तज्ज्ञ- १ जागा, साथीचे रोग तज्ञ- एक जागा, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी- १३ जागा, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- २० जागा, वैद्यकीय अधिकारी- ३७ जागा, स्टाफ नर्स स्त्री- ८ जागा, स्टाफ नर्स पुरुष- १ जागा, औषध निर्माता- १ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ३ जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
बहुउद्देशीय आरोग्य सेवक- बारावी सायन्स उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ- B.Sc., DMLT पदवी प्राप्त उमेदवार
औषध निर्माता- D.Pharm/B.Pharm पदवी प्राप्त उमेदवार
स्टाफ नर्स (स्त्री-पुरुष)- GNM/B.Sc. (Nursing) उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरतील
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी- MBBS पदवी प्राप्त उमेदवार
साथरोग तज्ज्ञ- MBBS/BDS/ AYUSH (ii) MPH/MHA/ MBA(Health) पदवी प्राप्त उमेदवार
बालरोग तज्ज्ञ- MD Paed/DCH/DNB पदवी प्राप्त उमेदवार
वय
- स्टाफ नर्स, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.
- इतर पदांसाठी उमेदवाराचे वय 70 वर्षांपर्यंत असावे.
निवड प्रक्रिया
बालरोग, साथरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. तर, इतर पदांसाठी मूल्यांकनाधिष्ठित ‘मेरिट’ यादीवर आधारित निवड केली जाईल.
पगार
या पदभरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार १८ हजार रुपयांपासून ते ७५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांना वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.