शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी वसई-विरारमध्ये १२ उड्डाण पूल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:47 AM

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विविध विभागातील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.

वसई : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विविध विभागातील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. हा ताण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये सुरुवातीला ३ उड्डाण पूल प्रस्तावित होते, मात्र आता वसई, विरार नालासोपारा मिळून एकूण १२ उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. दरम्यान हे उड्डाण पूल बांधण्यासाठी महापालिकेला अंदाजे ३०४ कोटीरुपये खर्च येणार असून त्याच्या मान्यतेचा प्रस्ताव शुक्र वारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर वसई विरार उपप्रदेशातील एमएमआरडी प्राधिकरणामार्फत हे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत.वसईचे शहरी व ग्रामीण असे दोन भाग असून वसई-विरार शहर महापालिका ही अगदी मुंबईला लागून असल्याने येथे दोन दशकात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होऊन लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने शहरात वाहतूक कोंडीचा त्रासही वाढला. या सर्व बाबींचा विचार करून वाहतूक कोंडीवर उपाय आणि नागरिकांना मोकळा श्वास मिळावा यासाठी महानगरपालिका विविध ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे १२ उड्डाण पूल बांधण्याचे काम हाती घेणार आहे. तसेच हे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे.>उड्डाण पूल व त्यांचे सर्वेक्षण पूर्ण!वसई विरार नालासोपारा येथील वाहतूक कोंडी व त्यांचे नियोजन व ती सुरळीत आज शहरात उड्डाण पूल उभारणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने मे.टंडन अ‍ॅण्ड कंपनीमार्फत उड्डाण पूलासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आवश्यक असलेल्या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यासाठी त्यांनी सूचवले असून यासाठी होणाºया खर्चाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे.>कुठे उभारणार उड्डाणपूल!माणिकपूर नाका, रेंज आॅफिस, गोखिवरे, श्रीप्रस्थ पाटणकर पार्क जंक्शन, चंदननाका जंक्शन, लक्ष्मी शॉपिंग सेंटर, बोळींज खारोडी नाका, विज्ञान उद्यान, मनवेल फाटा, फुलपाडा जंक्शन, बाभोळा नाका, नवघर पूर्व वसंत नगरी, नारंगी, साईनाथ नगर.>प्रस्तावित उड्डाणपूलउड्डाणपुलाचे ठिकाण अंदाजे खर्चमाणिकपूर नाका २८ कोटी ९६ लाखरेंज आॅफिस, गोखिवरे १९ कोटी ८१ लाखश्रीपस्थ पाटणकर १५ कोटी ५६ लाखपार्क जंक्शनचंदननाका जंक्शन १९ कोटी ११ लाखलक्ष्मी शॉपिंग सेंटर ५० कोटी २३ लाखबोळींज खारोडी नाका १६ कोटी ८९ लाखविज्ञान उद्यान १६ कोटी ८९ लाखमनवेल फाटा १८ कोटी २२ लाखफुलपाडा जंक्शन १८ कोटी ८९ लाखबाभोळा नाका ३१ कोटी ८१ लाख,नवघर पूर्व वसंत नगरी ५१ कोटी ४४ लाखनारंगी, साईनाथ नगर १६ कोटी ८९ लाख>सभेत १२ उड्डाण पुलांच्या बांधकाम मान्यतेसाठीचा प्रस्ताव येणाºया सभेपुढे ठेवण्यात आला असून त्याला मान्यता मिळाल्यास होणारा खर्च आणि एकूण प्रकल्पांची माहिती तसेच बांधण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात येईल.-राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता,वसई-विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार