डहाणूत पकडला 11 फुटी अजगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 19:21 IST2019-07-07T19:21:11+5:302019-07-07T19:21:34+5:30
सावटा गावच्या घोनगरपाडा येथे एका घराच्या आवारातून 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाचा अजगर सापडला.

डहाणूत पकडला 11 फुटी अजगर
- अनिरुद्ध पाटील
डहाणू - सावटा गावच्या घोनगरपाडा येथे एका घराच्या आवारातून 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाची अजगराची मादी रविवारी 7 जुलै रोजी वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेचे सर्पमित्र सागर पटेल आणि एरीक ताडवाला यांनी रेस्क्यू केले.
या पाड्यावरील योगेश माच्छी यांच्या घरामागे अजगर कोंबडी फस्त करीत असल्याची माहिती शेजारच्या महिलेने दिल्यानंतर या प्राणीमित्र संस्थेशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर दोन सदस्यांनी घटनास्थळी येऊन या मादी जातीच्या अजगराला पकडले. पावसाळ्यात सापांचा वावर वस्तीलगत आढळतो. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, सर्पांना ईजा न पोहचवता त्वरित वन विभाग तसेच या संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.