१०३ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, जिल्हाधिकारी गुरसळ यांनी केले अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 00:19 IST2021-05-08T00:18:39+5:302021-05-08T00:19:22+5:30
जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी केले अभिनंदन

१०३ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, जिल्हाधिकारी गुरसळ यांनी केले अभिनंदन
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : कोरोनाच्या आजाराने अनेक धडधाकट तरुणांचा बळी घेतल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या असतानाच पालघर नगरपालिका क्षेत्रातील वीरेंद्रनगर येथील १०३ वर्षीय आजोबांनी कोरोना आजारावर मात करण्यात यश मिळविले आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी स्वतः त्या आजोबांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.
पालघर नगर परिषद क्षेत्रातील वेवूर (वीरेंद्रनगर) मधील श्यामराव इंगळे या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. आजोबांना ताप आला होता. तपासणीनंतर त्यांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना पालघर येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. शंभरी गाठलेली असतानाही त्यांनी उपचारादरम्यान डॉक्टरांच्या औषधोपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे उपचारादरम्यान त्यांची ऑक्सिजनची पातळी राहिली. त्यांना कोविड केंद्रातून साेडण्याच्याआधी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आजोबांना पुष्प देऊन त्यांना निरोप दिला. त्यामुळे कोरोनाची बाधा झाली असली तरी योग्य काळजी, उपचार व धीटपणा यामुळे काेराेना बरा हाेऊ शकताे, हे श्यामराव इंगळे यांनी दाखवून दिल्याचे डॉ. गुरसळ यांनी सांगितले.