शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चे पथक तळेगावात दाखल

By admin | Updated: August 29, 2015 02:16 IST

तालुक्यातील तळेगाव (टालाटुले) ग्राम पंचायत प्रशासनाने मोठा घोळ केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

अहवाल सीईओंकडे सादर : घरासह शौचालयाचे छायाचित्र काढलेवर्धा : तालुक्यातील तळेगाव (टालाटुले) ग्राम पंचायत प्रशासनाने मोठा घोळ केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर कारवाई करीत सीईओ संजय मीना यांच्या आदेशावरून शुक्रवारी एक पथक तळेगाव येथे पोहोचले. तिथे त्यांनी तक्रारीत नमूद असलेल्या मुद्यावरून एका घराचे व घरी असलेल्या शौचालयाचे छायाचित्र काढले. या छायाचित्राचा अहवाल संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.ग्रामपंचायतमध्ये झालेल्या विविध विकास कामांतील कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांना दिले. तत्पूवी तक्रारकर्ते व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली. यावेळी अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यानंतर गुरुवारी येथील काही नागरिकांनी मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत कारवाईची मागणी केली. या प्रकरात येत्या १५ दिवसांत ही कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेत आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. या प्रकरणात येथील उपसरपंच शारदा देवराव मोहिजे यांनी घोळ केल्याचा आरोप होता. यानुसार मोहिजे यांच्या घराचे व घराच्या परिसरात असलेल्या शौचालयाचे छायाचित्र काढण्यात आले. यावेळी तक्रार कर्त्यांचीही उपस्थिती होती. याचा अहवाल तयार करून तो जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तक्रारीनुसार या प्रकरणात कारवाई सुरू झाली आहे. अहवाल सादर झाल्यानंतर यातील या प्रकरणात काय कारवाई होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)