शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सीईओंच्या आश्वासनावर आंदोलन मागे

By admin | Updated: October 4, 2016 01:58 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता कामबंद आंदोलन पुकारले होते.

वर्धा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता कामबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कोलमडली होती. याच मागण्यांकरिता सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून असलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे. आरोग्य विभागात शासनाची मान्यता असताना अनेक पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी, गौळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व एलआयसीच्या रकमेत असलेल्या घोळाची चौकशी करावी, यासह अनेक मागण्यांकरिता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गत महिन्यात काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले होते. मात्र या आंदोलनाकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनामुळे नागरिकांना अनेक अडचणी झाल्या, शिवाय आरोग्य विभागामार्फत शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांचा खोळाबा झाला. यावरही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी काढण्याकरिता २० आॅक्टोबर पर्यंतचा कालावधी मागितला. शिवाय या काळात या समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. चर्चेच्यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, विभागीय सचिव नलीनी उबदेकर, जिल्हा अध्यक्ष सिंध्दार्य तेलतुंबडे, जिल्हा सचिव प्रभाकर सुरतकर, उपाध्यक्ष विजय जांगडे, अमीत कोपूलवार, संजय डफरे, रतन बेंडे, माया राउत, कोषाध्यक्ष विजय वांदिले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) प्रत्येक मागणीचे आदेश जमा ४आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याकरिता मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेच्यावतीने करण्यात आलेली प्रत्येक मागणी शासनाच्या आदेशानुसार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय करण्यात आलेल्या मागण्यांचे शासन आदेश मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना देण्यात आले. यामुळे सीईओंनी मागण्या मान्य करण्याकरिता अवधी मागितल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली. २७ पीएससीतील काम ठप्प ४आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन आयोजित होते. या आंदोलनात जिल्ह्यातील संपूर्ण २७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित असल्याने या केंद्रातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे दिसून आले. नागरिकांना तालुक्याच्या स्थळी जावून उपचार घ्यावे लागले.