जि.प. सीईओंनी बोळवण केल्याचा तक्रारकर्त्याचा आरोप
By Admin | Updated: December 16, 2014 22:58 IST2014-12-16T22:58:19+5:302014-12-16T22:58:19+5:30
सेलू पंचायत समितींतर्गत येत असलेल्या खैरी (कामठी) व खापरी (ढोणे) येथील ग्रामसेवकांनी लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याची तक्रार कानगाव येथील तंटामुक्त समितीचे अर्धयक्ष भगवंता भोयर यांनी

जि.प. सीईओंनी बोळवण केल्याचा तक्रारकर्त्याचा आरोप
वर्धा : सेलू पंचायत समितींतर्गत येत असलेल्या खैरी (कामठी) व खापरी (ढोणे) येथील ग्रामसेवकांनी लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याची तक्रार कानगाव येथील तंटामुक्त समितीचे अर्धयक्ष भगवंता भोयर यांनी लोकशाही दिनात केली होती. त्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्याकरिता भोयर गेले असता त्यांना सदर प्रकरणाची खाते निहाय चौकशी सुरू असल्याचे सांगून बोळवण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनामध्ये जनतेच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. ४ आॅगस्ट २०१४ रोजी लोकशाही दिनामध्ये टोकण क्रमांक ६०१ अन्वये पंचायत समिती सेलू अंतर्गत ग्रामपंचायत खैरी (का.) येथील के. यु. शेंडे नामक ग्रामसेवकाने सात लाख ९८ हजार रुपयांच्या अनियमिततेचे प्रकरण दडपल्याबाबत, तसेच ग्रामपंचायत खापरी (ढोणे) येथील ग्रामसेवकाच्या २५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार दडपण्याचे प्रयत्न करणाऱ्या पंचायत समिती विस्तार अधिकारी जी. एल. माने व तत्कालीन गटविकास अधिकारी किटे यांच्या विरूद्ध फौजदारी कारवाई करण्याबाबत तक्रार करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालात प्रपत्र ब मध्ये चौकशी अहवाल तक्रारकर्त्या शाखेस पाठविण्यात यावा, असे नमूद करण्यात आले होते; मात्र आजपर्यंत प्रपत्र ब मधील अहवाल पाठविण्यात आला नाही.
१ डिसेंबर २०१४ रोजीच्या लोकशाही दिनामध्ये तक्रार दिली असता मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांनी संबंधीतांविरूद्ध खाते निहाय चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगून तक्रारकर्त्याची बोळवण केल्याचा आरोप एका तक्रारीतून केला आहे.(प्रतिनिधी)