ट्रकच्या धडकेत युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:00:38+5:30

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Youth seriously injured in truck collision | ट्रकच्या धडकेत युवक गंभीर

ट्रकच्या धडकेत युवक गंभीर

ठळक मुद्देबसस्थानक चौकातील घटना : ट्रकचालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : भाजी घेण्यास गेलेल्या युवकाला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात युवक गंभीर जखमी झाला. बसस्थानक चौक परिसरात हा अपघात झाला.
राहुल चौधरी (२१) रा. मोहगाव असे जखमी युवकाचे नाव आहे.
राहुल चौधरी हा बसस्थानक चौकात रस्त्याच्या कडेला भरत असलेल्या भाजीबाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेला होता. दरम्यान भरधाव येणाºया एम.एच.३४ बि.जी. २७२४ क्रमांकाच्या ट्रकने त्याला जबर धडक दिली. अपघातात राहुलचा उजवा पाय निकामी झाला. धडक दिल्यावर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला.
पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन करण्यात येत आहे.

गतिरोधक देण्याची मागणी
बसस्थानक चौक परिसरात चौरस्ता असून मोठी बाजारपेठ आहे. बाहेर गावावरून येणाºया नागरिकांची येथे मोठी वर्दळ असते. हैद्राबाद मार्गे येणाºया ट्रकला भंडारा मार्गे रायपूरजवळ पडत असल्याने २४ तास अवजड वाहनांचे आवागमण असते. या रस्त्याचे काम होवून तीन महिने उलटले असूनही बसस्थानक चौकात गतिरोधक दिले नसल्याने हा चौरस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे तत्काळ गतीरोधक देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
प्रशासनाचे कायम दुर्लक्ष
चौरस्त्यावर गतिरोधक देण्याची मागणी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली. पण, या मागणीकडे प्रशसनाचे कायम दुर्लक्ष होत आहे. गतिरोधक लावण्याचा ठराव ग्रामसभेतही मंजूर करण्यात आला असून प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. पण, तरी देखील याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केल्या जात आहे.

Web Title: Youth seriously injured in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात