मायलेकासह श्वानाचा विद्युत प्रवाहाचा झटका बसून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 15:46 IST2019-09-05T15:46:36+5:302019-09-05T15:46:56+5:30
वर्धा जिल्ह्यातील सिंदी मेघे येथे विद्युत प्रवाहाचा झटका बसलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

मायलेकासह श्वानाचा विद्युत प्रवाहाचा झटका बसून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील सिंदी मेघे येथे विद्युत प्रवाहाचा झटका बसलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.
येथील ग्रा. पं. सदस्य दीपाली सिद्धार्थ मेश्राम (४२) यांचा मुलगा रोहित (२४) याच्या श्वानाला विद्युत प्रवाहाचा झटका बसला. ते लक्षात येताच रोहितने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र यात रोहितलाही विद्युत प्रवाहाचा जबरदस्त झटका बसला. तिथेच असलेल्या त्याच्या आईने, दीपाली मेश्राम यांनी हे पाहिले आणि त्या रोहितला वाचवायला गेल्या असता त्यांनाही विजेचा झटका बसला. यात श्वानासह मायलेकांचा दुर्दैवी अंत झाला. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे.