..तर तुलाही फसवून टाकेन; प्रियकराकडून लग्नाच्या तगाद्याने त्रस्त प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 05:46 PM2022-06-11T17:46:13+5:302022-06-11T17:46:30+5:30

प्रेमदास हा नेहमी पूजाला लग्नासाठी तगादा लावायचा. मात्र, पूजाच्या आई-वडिलांचा लग्नाला विरोध असल्याने तिने प्रेमदासला स्पष्ट नकार दिला.

young woman try to commit suicide due to boyfriend force her for marrying him | ..तर तुलाही फसवून टाकेन; प्रियकराकडून लग्नाच्या तगाद्याने त्रस्त प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न

..तर तुलाही फसवून टाकेन; प्रियकराकडून लग्नाच्या तगाद्याने त्रस्त प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देहिंगणघाट येथील घटना : नागरिकांच्या सतर्कतेने वाचला तरुणीचा जीव

वर्धा : प्रियकरासह त्याच्या कुटुंबीयाकडून वारंवार सुरू असलेल्या लग्नाच्या तगाद्यामुळे युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वणा नदीच्या पुलावरून उडी मारणार, तेवढ्यातच नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे युवतीचा जीव वाचविण्यात आला. ही घटना हिंगणघाट येथे घडली असून, या प्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्ड परिसरातील रहिवासी २५ वर्षीय पूजा हिचे प्रेमदास चकोले रा.शिरुड याच्याशी प्रेमसंबंध होते. प्रेमदास हा नेहमी पूजाला लग्नासाठी तगादा लावायचा. मात्र, पूजाच्या आई-वडिलांचा लग्नाला विरोध असल्याने तिने प्रेमदासला स्पष्ट नकार दिला. ही बाब ऐकताच, संतप्त प्रेमदास याने, तू जर माझ्याशी लग्न केले नाही, तर मी मरून जाईन आणि तुलाही फसवून टाकेन, असे म्हणाला.

९ जून रोजी पूजा खोलीवर असताना प्रेमदासचे आई-वडील, बहीण आणि मामा आले व लग्नाचा तगादा लावून धमकी देऊन निघून गेले. याचा पूजाच्या मनावर चांगलाच परिणाम झाल्याने, पूजा थेट वणा नदीच्या पुलावर गेली आणि पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, तेवढ्यातच परिसरातील सजग नागरिकांनी पूजाला पकडून उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी पूजाचे बयाण नोंदवून प्रियकर प्रेमदास चकोले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: young woman try to commit suicide due to boyfriend force her for marrying him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.