यंदा लक्ष्मीपूजनाला मुकले पांढरे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:35+5:30

लक्ष्मीपूजनच्या वेळेस कापसाची आणि सोयाबीनची मोठ्या श्रध्देने पूजा केली जाते. तसेच भरघोस उत्पन्नासाठी देवाला साकडेही घातले जातात. मात्र यावर्षी अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी कापूस न आल्याने कापसाशिवायच लक्ष्मीपूजन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे शेतकºयांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसून आले.

This year, Lakshmipujan lost white gold | यंदा लक्ष्मीपूजनाला मुकले पांढरे सोने

यंदा लक्ष्मीपूजनाला मुकले पांढरे सोने

ठळक मुद्देपावसाचा फटका : शेतकरी नैराश्यात तर व्यावसायिक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पोळा आणि दिवाळी हे सण आनंदाचे व महत्वाचे मानले जातात. दिवाळीला खरीप हंगामातील उत्पन्न घरी येत असल्याने लक्ष्मीपूजनच्या वेळेस कापसाची आणि सोयाबीनची
मोठ्या श्रध्देने पूजा केली जाते. तसेच भरघोस उत्पन्नासाठी देवाला साकडेही घातले जातात. मात्र यावर्षी अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी कापूस न आल्याने कापसाशिवायच लक्ष्मीपूजन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे शेतकºयांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसून आले.
यावर्षी पावसाच्या वक्रदृष्टीने सोयाबीन उशिरा कापणीला आले आणि कपाशीची तर हल्ली शितादही सुध्दा झाली नसल्याने लक्ष्मीपूजनाला कापसाचे एक बोंडही शेतकऱ्यांच्या घरी आले नाही. चिकणीसह परिसरातील बºयाच शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच आहेत. काहींचे ढिग लागून तर काहींची कापणी सुरू आहेत. बºयाच शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच कापणीच्या प्रतिक्षेत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन घरी आलेत अशा शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात विकून दिवाळी साजरी केलीत.
पण; ज्यांचे सोयाबीन शेतातच आहेत अशा शेतकऱ्यांना मात्र उसनवारी घेऊन दिवाळी साजरी करावी लागली. शेतकऱ्यांचे पीक न निघाल्यामुळे बाजारपेठेतील व्यावसायीकांनाही त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागला. या दिवाळीत कापड, किराणा दुकानात विशेष गर्दी दिसत नव्हती. यामुळे व्यावसायीक सुध्दा अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

दरवर्षी दिवाळीच्या तीन दिवसा अगोदरच ग्राहकांची रीघ लागायची परंतु; यावर्षी मात्र तसे काही घडले नाहीत. शेतकºयांचे पीक न निघाल्यामुळे आम्हाला चांगलाच फटका बसला.
- राजेश गांधी, किराणा व्यावसायिक, देवळी.

शेतकºयांच्या भरवशावर आमचे व्यवसाय आहेत. शेतकऱ्यांचे पीकच निघाले नसल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्केही व्यवसाय झाला नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ग्राहकही नगण्यच होते.
- राजु कपुर, कापड व्यावसायिक, देवळी.

Web Title: This year, Lakshmipujan lost white gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती