वर्धा रेल्वेस्थानक होणार जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 14:24 IST2018-03-26T14:24:07+5:302018-03-26T14:24:18+5:30

भारत सरकारच्या माध्यमातून व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून एकूण सहा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास करुन तेथे जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र उभारण्याकरिता मंजुरी दिली आहे.

World Class Travel Centers to be Wardha Railway Station | वर्धा रेल्वेस्थानक होणार जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र

वर्धा रेल्वेस्थानक होणार जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र

ठळक मुद्देकेंद्राची मंजुरीमहाराष्ट्रातून सहा रेल्वेस्थानकांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारत सरकारच्या माध्यमातून व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून एकूण सहा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास करुन तेथे जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र उभारण्याकरिता मंजुरी दिली आहे. या सहा रेल्वेस्थानकांच्या यादीत वर्धा रेल्वेस्थानकाचा समावेश असल्याची माहिती वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी दिली.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या अधिकृत शासकीय ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शिवाजी नगर (पुणे), लोणावळा, इगतपूरी, सोलापूर, पुणे व वर्धा या रेल्वेस्थानकांची पुर्नविकास प्रकल्पाकरिता निवड करण्यात आली आहे. वर्धा रेल्वे स्थानकाचा विकास म्हणजे अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्याने भविष्यात अनेक लांब पल्ल्यांच्या प्रवासी रेल्वे गाड्या येथे थांबू शकतात. तसेच वर्धा रेल्वे स्थानकावरुन अनेक प्रवासी रेल्वे गाड्या प्रारंभ होण्याकरिता निश्चितच मदत होईल. वर्धा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास तसेच जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र निर्माण करताना तंत्रज्ञान, स्थानिक संस्कृती व ऐतिहासिक महत्त्व या प्रमुख तत्वांवर वर्धा रेल्वेस्थानकाची निर्मिती प्रस्तावित आहे. वर्धा रेल्वेस्थानकाच्या या विकास कार्याकरिता कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून झोनल रेल्वे (मध्य रेल्वे) यांना अधिकृत करण्यात आल्याची माहिती यावेळी खासदार तडस यांनी दिली. वर्धा रेल्वेस्थानकाची पुर्नविकास प्रकल्पाकरिता निवड झाल्याची बातमी कळल्यानंतर खासदार तडस यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची रेलभवन, दिल्ली येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले.

Web Title: World Class Travel Centers to be Wardha Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.