वरिष्ठ नागरिकांचे अधिकार विषयावर कार्यशाळा
By Admin | Updated: October 7, 2016 02:22 IST2016-10-07T02:22:14+5:302016-10-07T02:22:14+5:30
प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता शाश्वती कक्ष (आयक्यूएसी), रासेयो व जिल्हा विधी

वरिष्ठ नागरिकांचे अधिकार विषयावर कार्यशाळा
वर्धा : प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता शाश्वती कक्ष (आयक्यूएसी), रासेयो व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘वरिष्ठ नागरिकांचे अधिकार’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये व त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळणारे ‘कायदेविषयक सहाय्य’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंभा सोनाये तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश खोंगल उपस्थित होते. कार्यशाळेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव, सु. ना. राजूरकर , दिवाणी न्यायाधीश धनंजय काळे आणि अॅड. बी.डी. लांबट यांनी मार्गदर्शन केले.
पूर्वी घरात हवे नको ते बघण्याची मुलांची धडपड असायची. पण आज परिस्थिती बदलली आहे. त्यांना वृद्ध व्यक्ती घरात असणे अडचणीचे वाटते. वरिष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय मिळावे व त्यांचे पालनपोषण नीट व्हावे याबाबत फौजदारी प्रक्रिया संहीतेमध्ये तरतूद केलेली आहे. वरिष्ठ नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्याचा विचार करून सन २००७ मध्ये आई-वडील व वरिष्ठ नागरिकांचे कल्याण व पालणपोषण अधिनियम २००७ अंमलात आले. या कायद्यातील तरतुदीवर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. मंचावर न्यायधीश ठाणेकर, कुलकर्णी, बेलसरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका डॉ. धनंजय सोनटक्के यांनी मांडली. आभार डॉ. सुधाकर सोनोने यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. प्रियराज महेशकर, प्रा. दीपक महाजन, प्रा. अमोल घुमडे, देविदास चवरे, वेदनाथ चौधरी, विनोद बावणे, दिनेश भगत, प्रमोद माथनकर, राजू मंजेवार, नरेश आगलावे, ऋतुजा बावणे, सीमा चव्हाण, निकिता उघडे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)