जीवनाच्या मूलभूत तत्त्वावर कार्यशाळा
By Admin | Updated: July 29, 2014 23:59 IST2014-07-29T23:59:33+5:302014-07-29T23:59:33+5:30
येथील गांधी सिटी पब्लिक स्कूल येथे शिक्षकांकरिता एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे एन. एस. निलकंदन उपस्थित होते. संस्थाध्यक्ष

जीवनाच्या मूलभूत तत्त्वावर कार्यशाळा
शिक्षकांना मार्गदर्शन : अध्यापन कौशल्य विकासावर भर
वर्धा : येथील गांधी सिटी पब्लिक स्कूल येथे शिक्षकांकरिता एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे एन. एस. निलकंदन उपस्थित होते. संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य गौरी चौधरी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व स्वागत केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अग्निहोत्री म्हणाले, शिक्षणाचा मूलभूत पाया हा सत्य, ध्येय, जागरुकता, ज्ञान या चार गोष्टीवर अवलंबून आहे. जे शिक्षण आपण घेतो ते सत्य असले पाहिजे, शिक्षणाद्वारे आपल्याला ध्येय प्राप्त होते. शिक्षणासंबंधी आपल्यात जागृती यायला हवी तरच आपल्याला जीवनात सफलता मिळते. शिक्षकांनी दररोज नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. तरच तो विद्यार्थ्यांना घडवू शकेल. पुस्तकी ज्ञानापुरतेच मर्यादित न राहता नवीन शोध करण्याची शक्ती असायला हवी, असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. यानंतर बोलताना निलकंदन यांनी जीवनाची पाच तत्व सांगितले. या प्रकृतीचे आपले काही नियम आहे. जसे, गुरूत्वाकर्षणामुळे एखादी वस्तू वर फेकली असता ती खालीच येईल. मनुष्य व प्राण्यांमध्ये फरक आहे. आपल्या जीवनात कोणतीच गोष्ट कठीण नाही मात्र याकरिता मेहनत करावी लागेल तरच ती शक्य होईल. दुसऱ्याला देण्याची वृत्ती ठेवायला पाहिजे तरच त्यांच्याकडून आपल्याला काही प्राप्त होईल. हे तत्त्व त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची आवड काय आहे, ध्येय काय हे समजून घ्या. त्यानुसार त्याला मार्गदर्शन करायला हवे. त्यांनी अध्यापनाचा दर्जा वाढविण्यावर भर दिला. कार्यक्रमाचे संचालन रीचा दुबे यांनी केले. या कार्यशाळेला प्राचार्य स्वरा अष्टपुत्रे, प्राचार्य नायक व सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)