मातंग समाजाच्या उद्धारासाठी एकजुटीने कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:12+5:30

समाज प्रगतीच्या दिशेने झेप घेत असताना मातंग समाजानेसुद्धा मागे न राहता विकासाच्या या प्रवाहात सामील होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सचिव व राष्ट्रीय लहुशक्तीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी व्यक्त केले.

Work together for the betterment of the Matang community | मातंग समाजाच्या उद्धारासाठी एकजुटीने कार्य करा

मातंग समाजाच्या उद्धारासाठी एकजुटीने कार्य करा

ठळक मुद्देमधुकर कांबळे यांचे आवाहन : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर समाजात जनजागृती चळवळ राबविली. पोवाडे, कांदबऱ्या या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. लोकांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटविण्यासाठी पोवाड्याचा आधार घेत समाजप्रबोधनाचे कार्य केले. सर्व समाज प्रगतीच्या दिशेने झेप घेत असताना मातंग समाजानेसुद्धा मागे न राहता विकासाच्या या प्रवाहात सामील होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सचिव व राष्ट्रीय लहुशक्तीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त राष्ट्रीय लहुशक्ती वर्धा जिल्हाद्वारा देवळी येथील हरिदिनी भोंग सभागृहात आयोजित मातंग समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. उद्घाटक समीर देशमुख होते. राष्ट्रीय लहुशक्तीचे विदर्भप्रमुख गणेशदास गायकवाड, देवी कृउबाचे उपसभापती व जि.प. सदस्य संजय कामनापुरे, धनराज तेलंग, पं. स. सभापती विद्या भुजाडे, सुचिता मडावी, रेखा कांबळे, आशा जालफळ, मिलिंद कांबळे, सचिन पोटफोडे, गजानन महाजन, नीतेश बावणे, सुमन बावणे, दिलीप पोटफोडे, नितीन देशमुख, अमोल कसनारे, विलास डोंगरे, गणेश मुंगले, अमोल गायकवाड, नंदू वैद्य, बावनकर यांची उपस्थिती होती.
कांबळे यांनी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवित असल्याची माहिती देत लाभ घेण्याचे आवाहन केले. समीर देशमुख यांनी मातंग समाजाच्या उद्धारासाठी असे मेळावे गरजेचे असून समाजाला या माध्यमातून नवी दिशा मिळते, असे सांगितले. यावेळी मधुकर कांबळे व समीर देशमुख यांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये फकिरा खडसे, राजेश अहिव, गुलाब कळणे, देवानंद बेडे, दशरथ बावनकर, प्रभाकर खंदार, पुंडलिक पवार, शंकर बावणे, गोपाल कावळे, सुमन बावणे, संगीता वानखडे, अजय डोंगरे, श्याम इंगोले, अशोक डोंगरे, सुरेश चव्हाण, राजेश चन्ने, दर्शन मेढे, रामदास खडसे, गजानन मुंगले, नामदेव शिखरे, भीमराव हिवराळे, दुर्गा गवळी, रोहित लोहकरे, दिंगाबर मुगले, अमोल गायकवाड, शीतल खंदार, दुर्गा पोटखोडे, प्रियांका कांबळे, हरिभाऊ डोंगरे यांचा समावेश आहे.

Web Title: Work together for the betterment of the Matang community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.