शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

आपत्तीकाळात ‘ओनरशिप’ पद्धतीने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:06 PM

नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारी, कर्मचारी किती व कसा प्रतिसाद देतात, यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान आणि जीवितहानी अवलंबून असते. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने ओनरशिप पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : मान्सूनपूर्व आढावा बैठक, धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारी, कर्मचारी किती व कसा प्रतिसाद देतात, यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान आणि जीवितहानी अवलंबून असते. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने ओनरशिप पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी भिमनवार बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, चंद्रभान खंडाईत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, जिल्हा परिषद लघु सिंचन कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता मून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनटक्के उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदार यांच्याकडे असलेल्या नादुरुस्त बोटी तात्काळ दुरुस्त करून चाचणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. जिल्ह्यात ९ पुलांवरून पुराचे पाणी वाहते. अशावेळी पुलांवरून पाणी उतरेपर्यंत तेथे निगराणीसाठी मंडळ अधिकारी यांनी एक व्यक्ती ठेवावी. तसेच अशा धोक्याच्या ठिकाणी अंधारात दिसतील असे फलक लावावेत. बोट चालविता येणाºया व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच ४ महिन्यांसाठी त्यांची नेमणूक करून त्यांना मानधन देता येईल. जेणेकरून, आपत्तीच्या काळात ऐनवेळी बोटचालक शोधण्याची गरज भासणार नाही, असेही भिमनवार म्हणाले.जिल्ह्यात २१४ नदीकाठावरील गावे आहेत. त्यापैकी ८८ गावे धोकादायक आहेत. या सर्व गावात आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करून शोध व बचावपथक स्थापन करावे. गावपातळीपर्यंत योग्य माहितीचे प्रसारण होते की नाही, याची शहानिशा करावी. तसेच गावस्तरीय शासकीय कर्मचाºयांचा समन्वय करण्याची जबाबदारी तलाठी यांच्यावर सोपविण्यात यावी. नगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करून त्या रिकाम्या कराव्यात आणि पाडण्यात याव्यात. नाले आणि गटारे यातील गाळ काढून स्वच्छ करावीत, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.पर्जन्यमापक यंत्र अद्ययावत आहेत का, याची तहसीलदारांनी खात्री करावी. आरोग्य विभागाने रोगराई संदर्भात सर्व तयारी करावी. औषधांचा मुबलक साठा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवावा. जास्त वीज पडणाºया गावांची यादी करून तिथे लायटनिंग अरेस्टर लावण्याचे नियोजन करावे. सर्पमित्रांची यादी तयार करावी अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दिल्यात. तसेच या बैठकीला अनुपस्थित असणाºया अधिकाºयांना नोटीस द्यावी, अशाही सूचना भिमनवार यांनी दिल्यात.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनीसुद्धा काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात. यामध्ये धरणाचे गेट चालू-बंद होत असल्याची तपासणी करून अहवाल द्यावा तसेच त्याची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करावी. ऐनवेळी गेट बंद न झाल्यामुळे पुराचा धोका होऊ शकतो, त्यामुळे यासंदर्भात विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. तसेच जिल्हाधिकारी यांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय धरणाचे गेट उघडू नयेत आणि पाण्याचा विसर्ग करू नये. धरणातून पाणी सोडल्यामुळे अनेक गावांना पुराचा धोका संभवू शकतो. त्यामुळे आधी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देणे आवश्यक असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण जगासमोर ओडिशाने उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. त्यापद्धतीने आपणही काम करण्याची प्रेरणा घ्यावी, असे दैने म्हणाले.यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरणाद्वारे सर्व विभागांनी करावयाच्या कामांची माहिती दिली. यावेळी तहसीलदार प्रीती डुडुलकर, राजू रणवीर, गटविकास अधिकारी तसेच इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी