एकबुर्जी येथील पुलाचे काम दोनवर्षांपासून रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:14 IST2018-06-23T00:12:54+5:302018-06-23T00:14:59+5:30
विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

एकबुर्जी येथील पुलाचे काम दोनवर्षांपासून रखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
विरुळ (आकाजी) : विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सदर समस्येकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत थंडबस्त्यात पडलेल्या या कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
सदर पूल जीर्ण झाल्याने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात नियोजन करण्यात आले. निधी प्राप्त झाल्यानंतर निविदा काढून कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. परंतु, सध्या स्थितीत नाल्यावरील सदर पुलाचे काम ठप्प पडले आहे. इतकेच नव्हे तर या पुलाला अद्यापही संरक्षण कठडे न बसविण्यात आल्याने एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण मिळत आहे.
इतकेच नव्हे तर पुलावर डांबरीकरण सुद्धा करण्यात आले नाही. पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून ये-जा करणाºयांना चिखल तुडवतच पुढील प्रवास करावा लागत असल्याने दोन वर्षांपासूनचे रखडलेल्या या पुलाच्या कामाला तात्काळ गती देण्याची मागणी या भागातील नागरिकांची आहे.
सर्वत्र असतो चिखल
पुलाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती असून पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाने चिखलातूनच वाट काढावी लागते. अनेकदा वाहनेही अनियंत्रित होतात. त्यामुळे अनुचित घटनेला आमंत्रण मिळत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात या नाल्यावरील पुलावर चिखलाचे साम्राज्य राहत असल्याने साधे पाई ये-जा करणेही कठीण होते. या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजचेचे आहे.