महिला आत्मसन्मानाची सुरुवात घरातून व्हावी
By Admin | Updated: July 20, 2014 00:05 IST2014-07-20T00:05:42+5:302014-07-20T00:05:42+5:30
दोन व्यक्तींचे प्रेम हे वैयक्तिक असू शकते. परंतु अत्याचार हा सामूहिक असतो. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे अत्याचार रोखण्यासाठी महिलेचे स्वतंत्र अस्तित्व माणण्याची

महिला आत्मसन्मानाची सुरुवात घरातून व्हावी
विभा गुप्ता : राष्ट्रभाषा प्रचार समितीत महिला संरक्षणावर सभा
वर्धा : दोन व्यक्तींचे प्रेम हे वैयक्तिक असू शकते. परंतु अत्याचार हा सामूहिक असतो. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे अत्याचार रोखण्यासाठी महिलेचे स्वतंत्र अस्तित्व माणण्याची गरज असून तिला आत्मसन्मान देण्याचीही गरज आहे. आणि याची सुरूवात घराघरातून व्हावी असे मत मगन संग्रहालयाच्या संचालिका डॉ. विभा गुप्ता यांनी व्यक्त केले.
विशाखा गाईड लाईन तसेच भारत सरकार कायदा सुधारानूसार राष्ट्रभाषा प्रचार समिती येथे स्थापित विशाखा समितीच्या सभेत प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी प्रा.कुसुम त्रिपाठी, अॅड.अर्चना वानखेडे, समिती सहाय्यक मंत्री प्रकाश बाबले, प्रचार मंत्री डॉ. हेमचंद्र वैद्य आणि संयोजिका अरुणा देशमुख मंचावर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना अॅड. वानखेडे म्हणाल्या, प्रत्येक संस्थानात विशाखा समितीचे गठन होणे आवश्यक आहे. यामुळे कार्यालयीन पुरुष कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या छळाला आळा बसेल. अध्यक्षीय भाषणात प्रा.त्रिपाठी म्हणाल्या, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. हे थांबवण्यासाठी समाज व्यवस्थेत काही मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. अरुणा देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रभाषा महिला सेलविषयी माहिती दिली. यावेळी समितीचे अधिकारी कार्यकारी शिक्षक विद्यार्थी आणि परिसरातील महिलांची गुणसंख्येने उपस्थिती होती. संचालन महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री पत्की यांनी केले. उपस्थितांचे आभार अनिता राजमल्वार यांनी मानले. यावेळी विविध कार्यालयाच्या महिलांची उपस्थिती होती. त्यांनी प्रश्न विचारून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.(शहर प्रतिनिधी)