Women farmers are the only battlefields in the epic | महिला शेतकरीदिनी महाकाळीत एकवटल्या रणरागिणी
महिला शेतकरीदिनी महाकाळीत एकवटल्या रणरागिणी

ठळक मुद्देसक्षमीकरणाबद्दल मार्गदर्शन : मेळाव्यात दोन तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमधील ७३५ महिलांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महिलांना सक्षम करण्याकरिता त्यांच्या हाताला काम देऊन आर्थिक संपन्न बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि महिद्रा प्रेरणा उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महिला किसान दिनी महाकाळी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला देवळी व आर्वी तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीमधून ७३५ महिला सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिलांना उपस्थित मान्यवरांनी व्यवसायाभिमूख मार्गदर्शन केले.
कार्यक्र माला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक सुहास पाटील, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रवीण कुºहे, त्रिपाठी, कृषि विज्ञान केंद्र वर्धाच्या डॉ. प्रेरणा धुमाळ, जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, निरंजन वºहाडे, अभिजीत उबरहांडे, अविनाश फुलबेल आदींची उपस्थिती होती. यावेळी सुहास पाटील यांनी बचत गट उत्पादने, त्यांचे प्रशिक्षण, नागपूर मधील विक्रीच्या संधी, उपक्रमाचा दूर दृष्टीकोण, महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी असलेले लक्ष्य या शिवाय महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे, अशी महिंद्रा प्रेरणा उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. प्रवीण कुºहे यांनी या २३ गावांमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच आगामी काळात महिला शेतकºयांची प्रेरणा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. कृषि विज्ञान केंद्राच्या डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी परसबाग, भाजीपाला प्लॉट, शेवग्याचा प्लॉट, सीताफळ प्लॉट याचे कुटुंबातील महत्व, पोषनासाठी परसबागेचे महत्व, त्यात कोणत्या भाज्या लावल्या जातात त्याची शास्त्रीय कारणे आणि त्यातून जिवनावश्यक कोणते घटक मिळतात. याबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी योगिनी सोमन, डॉ. प्रेरणा धुमाळ, नम्रता शिंगोटे-कालेकर यांनी महिलांचे स्वागत केले. कार्यक्रमा दरम्यान यावर्षी चांगले पीक व उत्पन्न घेणाºया १९ महिलांना प्रेरणा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नामदेव आखाडे तर आभार अभिजीत देव यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामपरिवर्तक उपस्थित होते.

या गावामील महिलांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला देवळी तालुक्यातील वाटखेडा, डिगडोह, तळणी (भागवत), गिरोली, भिडी, मलकापूर, लोणी, नांदोरा, सोनोरा (ढोक), पळसगाव, फत्तेपूर, कवठा (रेल्वे) तर आर्वी तालुक्याच्या परसोडी ( टेंभरी), पिंपळगाव (भोसले), बेल्हारा, तळेगाव (रघुजी), काचनूर, बोदड, वाडगाव (पांडे) सालदरा, हिवरा या गावातील महिला सहभागी झाल्या होत्या.


Web Title: Women farmers are the only battlefields in the epic
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.