ट्रक-आॅटो अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:56 IST2018-04-17T23:56:49+5:302018-04-17T23:56:49+5:30
सेलडोह येथून प्रवासी घेवून केळझरला येत असलेल्या एम.एच.३१ ए.जी. ८१९३ क्रमांकाच्या आॅटोला भरधाव ट्रकने धडक दिली. यात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला.

ट्रक-आॅटो अपघातात महिला ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : सेलडोह येथून प्रवासी घेवून केळझरला येत असलेल्या एम.एच.३१ ए.जी. ८१९३ क्रमांकाच्या आॅटोला भरधाव ट्रकने धडक दिली. यात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी वर्धा-नागपूर महामार्गावरील सामाजिक वनीकरण जवळ सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. सीमा वाल्मीक नाकाडे (३६) वर्ष रा. सेलडोह असे मृतकाचे नाव आहे.
सीमा नाकाडे या महिला बचतगटाच्या कामानिमित्त केळझरला येत होत्या. दरम्यान सदर अपघात झाला. या घटनेची नोंद सेलू पोलिसांकडून घेण्यात आली असून तपास सुरू आहे.