शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

वर्ध्यात महिलेने दिला तिळ्यांना जन्म 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:03 IST

वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी एका महिलेने तीन मुलांना जन्म दिला असून मातेसह बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालयातील पहिलीच घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: एका महिलेने एकाच वेळी दोन मुलांना जन्म देणे हा विषय सध्याच्या विज्ञान युगात नागरिकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा राहिलेला नाही. असे असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी एका महिलेने तीन मुलांना जन्म दिला असून मातेसह बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ही या रुग्णालयातील पहिलीच घटना असल्याने सदर विषय रुग्णालयात चांगलाच चर्चिला जात आहे.वर्धा शहरातील पुलफैल येथील इना शेख कैश इस्माईल शेख नामक महिलेला तिच्या कुटुंबियांनी प्रसूतीसाठी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सदर महिलेला रुग्णालयात दाखल करताच तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्या महिलेने त्याच दिवशी सकाळी ११.५२ वाजता १.२ किलो, ११.५८ वाजता ०.९५० किलो व दुपारी १२ वाजता ०.९८० किलो वजनाच्या तीन मुलांना जन्म दिला. नुकतेच जन्मलेल्या तीन मुलांपैकी दोन मुलांचे वजन थोडे कमी असल्याने डॉक्टरांच्या निदर्शनास येताच या मातेसह तिच्या तिन्ही मुलांची विशेष काळजी रुग्णालय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली. परंतु, रविवारी या तिन्ही नवजात बालकांची शुगर वाढत असल्याचे व त्यांची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास येताच सदर मातेसह मुलांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितले. सदर महिलेची प्रसूती योग्य पद्धतीने व्हावी तसेच नुकत्याच जन्मलेल्या बाळांना योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अनुपम हिवलेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती विभाग प्रमुख डॉ. मनिषा नासरे, डॉ. प्राजक्ता चिंदालोरे, डॉ. सोनी सिंग, डॉ. मारीया खातून, डॉ. प्रियंका तळवेकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे, डॉ. अमोल येळणे यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.इना शेख कैश इस्माईल शेख नामक महिला प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली होती. तिने येथे तिळ्या मुलांना जन्म दिला. नवजात बालक हे सुरूवातीला २४ तास अगदी व्यवस्थित होते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मातेचे व मुलांचे आरोग्य व्यवस्थित आहे.- डॉ. अनुपम हिवलेकर, अति. जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य