शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

गांधी आश्रमातील आदी निवास ‘चले जाव’चा साक्षीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

इतिहासात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. याच दिवशी मु़ंबईच्या गवालिया टँक आझाद मैदानावर काँग्रेसच्यावतीने इंग्रजांच्या विरोधात चले जावची घोषणा करण्यात आली. ब्रिटिशांनी हा देश सोडून चालते व्हा असा इशारा देण्यात आला. वर्धा येथे १४ जुलै १९४२ कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. आश्रमातील आदी निवासात पार पडलेल्या या बैठकीतच ठरावाचा मसुदा तयार करण्यात आला.

दिलीप चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठे जनआंदोलन म्हणजे ‘भारत छोडो’ आंदोलन. याच आंदोलनाचा एल्गार पुकारताना महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’चा नारा दिला. या ठरावाचा मसुदा आणि बैठक महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम येथील आश्रमातील आदी निवास मध्ये झाली. हे आदी निवास आजही ‘चले जाव’ चा साक्षीदार आहे. यंदाचे वर्ष स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष असून चले जावो या आंदोलनाला यंदा ७९ वर्षे पूर्ण झाली. इतिहासात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. याच दिवशी मु़ंबईच्या गवालिया टँक आझाद मैदानावर काँग्रेसच्यावतीने इंग्रजांच्या विरोधात चले जावची घोषणा करण्यात आली. ब्रिटिशांनी हा देश सोडून चालते व्हा असा इशारा देण्यात आला. वर्धा येथे १४ जुलै १९४२ कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. आश्रमातील आदी निवासात पार पडलेल्या या बैठकीतच ठरावाचा मसुदा तयार करण्यात आला.अन् सेवाग्राम येथील ठराव पोहोचला मुंबईतसेवाग्राम येथील आश्रमातूनच गांधीजी, कस्तुरबा, महादेवभाई देसाई, मीरा बहन, डॉ. सुशिला नायर आणि अन्य सहकारी मुंबईत दिनांक ७ व ८ ऑगस्ट १९४२ च्या बैठकीसाठी रवाना झाले. काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ८ ऑगस्टला त्यावर गवालिया टँक मैदानावर जाहीर सभेत शिक्कामोर्तब झाले. याच ठिकाणी गांधीजींनी आजपासून आपण स्वतंत्र झालो असे समजा, असे सांगत इंग्रजांविरुद्ध चले जावचा नारा बुलंद केला. त्यानंतर ९ ऑगस्ट १९४२ ला भारत छोडोचे आंदोलन देशभरात सुरू झाले. इंग्रजांनीही आंदोलन दडपण्यासाठी गांधीजीसह अन्य प्रमुख राष्ट्रीय नेते व सहकाऱ्यांना अटक केली. त्यामुळे ९ ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासात क्रांतिदिवस म्हणून सूवर्ण अक्षरात नोंदविण्यात आला आहे.

व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते झाले- व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी भारतावर तब्बल दीडशे वर्षे राज्य केले. भारतीयांना त्यांच्याकडून गुलामागत वागणूक दिली जायची. भारतातील संपत्ती आणि कच्चा माल थेट आपल्या देशात नेऊन इंग्रजांनी एकप्रकारे भारतीयांची लूटच केली. इंग्रजांकडून अन्याय-अत्याचार केले जात असतानाच गांधीजींनी भारत भ्रमण करून अहिंसक मार्गाने आणि स्वावलंबन, ग्रामोत्थान, सूतकताई, शिक्षण आदी काम सुरू केले. सुरुवात सेवाग्राम आश्रम आणि हिंदुस्थानी तालिमी संघ,चरखा संघ तसेच जवळ्पास सुरू करण्यात आलेल्या रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थाच्या निर्माणातून आश्रम बनले. देशासाठी कार्यकर्ता घडविण्याचे केंद्र सेवाग्राम बनले. गांधी विचार रुजविणारी पहिला शाळा सेवाग्राम येथेच नावरुपास आली.

अनेकांशी केली चर्चाब्रिटिशांना अखेरचा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी काय शब्द असावा याबाबत गांधीजींनी अनेकांशी चर्चा केली. गेट आऊट, रिट्रीट इंडिया, विथड्रा इंडिया असे शब्दप्रयोग बापूंनी नाकारले. याच दरम्यान युसूफ मेहर अली यांनी क्विट इंडिया हा शब्दप्रयोग सुचविला. याला तात्काळ गांधीजींनी मान्यता दिली. पुढे चले जाव व भारत छोडो या घोषणांनी जनमानसाच्या मनावर पकड निर्माण केली.

ती चार भाषण ठरली परिणामकारक८ ऑगस्टला ऐतिहासिक चार भाषणे झाली. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मौलाना अबुल कलाम आझाद होते. त्यांचे भाषण पहिले झाले. पं. जवाहरलाल नेहरू यांनी कार्यकारिणीच्या सभेत ठराव वाचून दाखविला आणि ठरावाचे समर्थन करणारे भाषण केले. ठरावाला अनुमोदन देणारे भाषण सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. हा ठराव सभेने मंजूर करावा याचे प्रास्ताविक भाषण केले. गांधीजींनी‌ हिंदी व इंग्रजीतून आपले विचार मांडणारे भाषण दिले. हे भाषण सव्वादोन तास चालले.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम