विनाकारण फिरणाऱ्यांचा ठाणेदारांनी घेतला ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:50+5:30

जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरी दक्षता म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन नागरिकांना केले जात आहे. परंतु, याच आवाहनाकडे ५४ व्यक्ती पाठ दाखवित असल्याचे त्यांना ताब्यात घेत त्यांना समज देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Without reason Rotate Thanedar take 'Class' | विनाकारण फिरणाऱ्यांचा ठाणेदारांनी घेतला ‘क्लास’

विनाकारण फिरणाऱ्यांचा ठाणेदारांनी घेतला ‘क्लास’

ठळक मुद्दे५४ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई : मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉक करणाऱ्यांवर पोलिसांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर, यवतमाळ व अमरावती या वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. पण वर्धा जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरी दक्षता म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन नागरिकांना केले जात आहे. परंतु, याच आवाहनाकडे ५४ व्यक्ती पाठ दाखवित असल्याचे त्यांना ताब्यात घेत त्यांना समज देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहर पोलिसांची चमू गस्तीवर असताना शहरातील विविध भागात काही व्यक्ती मॉर्निंग वॉकचे कारण पुढे करून घराबाहेर पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी राम किसन कनोजे, संदीप देवराव कदम, कपील राजकुमार यादव, राजेंद्र मनोहर गुरू, राजेद्र शंभुलाल गुप्ता, गणपत सुनील ठोबरे, शरद आनंद भांडेकर, प्रमोद जगन्नाथ रागीट, राजू बापुराव वंजारी, गौतम उमेश उके, रत्नाकर मुरलीधर ढोणे, विवेक गणपत पाटील, रोहन ज्ञानेश्वर पाटनकर, राहूल सुभाषसिंग सुर्यवंशी, गौतम हातागडे, कुणाल कुथे, कृष्णा डोळे, आकाश महाकाळकर, अशोक कुपचंदानी, गजानन वटकर, अशोक काळबांडे, पराग खंगार, ललील धोंगडे, संतोष पटनारे, महेश लाडेकर, गणेश हिंगे, सलीम चांद शेख, गजानन मोरनकर, अजिंक्य देव, सुरज शर्मा, नीतेश फुलझेले, आकाश पारधी, प्रविण यादव, पवन जोशी, गिरीष केळापुरे, विलास मानकर, प्रविण वाघमारे, किशोर सातपुते, अनिल क्षीरसागर, अनिल वैद्य, गोपीचंद अंदानी, शरद कोंडुलकर, राधेश्याम शेंडे, प्रविण बोरकर, ज्ञानेश्वर भिसे, राजू ठाकरे, आकाश दिलवान, गोपीचंद खुबदानी, धर्मपाल हिवरकर, रमेश बावणे, पवन महाबुधे, सौरभ धोंगडे, स्वप्नील चौधरी, दीपक साहू यांना ताब्यात घेत त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. तेथे या व्यक्तींना समुपदेशन करून त्यांच्याकडून २४ हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोरोनापासून स्वत:ला वाचविण्यासह तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षीत रहावा यासाठी प्रत्येक नागरिकाने लॉकडाऊनच्या काळात घरातच थांबावे. अतिशय आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे. विनाकारण घराबाहेर पडणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
- योगेश पारधी, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, वर्धा.

Web Title: Without reason Rotate Thanedar take 'Class'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.