शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाचे भाव वाढणार की घटणार? वर्षभराचा गहू आताच भरून ठेवणे योग्य ठरेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:45 IST

Wardha : यावर्षी रब्बी हंगामातील नव्या गव्हाची बाजारात आवक सुरू झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग आला आहे. मागील आठवडाभरापासून बाजारात नवा गहू दाखल होत आहे. गव्हाला सरासरी २८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. पुढील काही दिवसांत बाजारात गव्हाची आवक वाढणार असल्याने गव्हाचे भाव वाढणार की उतरणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्य नागरिक ते नोकरदार वर्ग बाजारात नवा गहू दाखल झाल्यावर चार ते सहा महिने पुरेल एवढा गहू, ज्वारी खरेदी करून ठेवतात. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच गव्हाला चांगला भाव मिळत असतो. मात्र, आवक वाढत असल्यामुळे गव्हाच्या भावात पुढील काही दिवस घट झाल्याचे दिसू शकते. गहू खाणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे मागणीदेखील त्यांच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील बाजारपेठेत गव्हाचे सध्याचे दर काय ?वर्धा जिल्ह्यातील गव्हाच्या बाजारपेठेत गव्हाला २ हजार ५०० ते २ हजार ८०० पर्यंत भाव मिळत आहे. याशिवाय लोकल गव्हालादेखील बाजारात मागणी आहे.

लोकल गहू चवदारजिल्ह्यात लोकल गव्हासह शरबती गव्हाला देखील चांगली मागणी आहे. हा गहू खाण्यासाठी चवदार असल्याने नागरिकांकडून या गव्हाची अधिक मागणी होताना दिसत आहे.

पोषक वातावरणाचा गव्हाला होणार फायदायावर्षी रब्बी हंगामात गव्हाची पेरणी चांगली झाली होती. वातावरणदेखील पोषक असल्यामुळे यावर्षी गव्हाचे पीक चांगले बहरले होते. त्यामुळे यावर्षी गहू उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादनदेखील येत आहे. त्यातून थोडा फार फायदा होत आहे.

वार्षिक धान्य खरेदीसाठी नागरिकांची लगबगनवा गहू बाजारात दाखल झाल्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या गव्हाला चांगला भाव असल्याने शेतकरीदेखील बाजारात नवा गहू घेऊन येत आहेत. यावर्षीचा गहू चांगल्या दर्जाचा असल्यामुळे नागरिक या गव्हाला पसंती देत आहेत.

गहू साठविताना काय काळजी घ्याल?गव्हाची दीर्घकाळ साठवणूक करण्यासाठी गव्हात कडुलिंबाची पाने शेतकरी टाकून ठेवतात. तसेच गव्हाला कोरड्या जागेवर त्यांची साठवणूक केली जाते. कीड लागणार नाही यासाठी बाजारात पावडरदेखील उपलब्ध आहे. त्याचा अनेक शेतकरी उपयोग करताना दिसून येत आहेत.

२५०० रुपयांहून अधिक भावात गहू विकला जात आहेसध्या बाजारात गव्हाची आवक वाढली आहेत. अशात बाजारात गव्हाला २ हजार ५०० ते २८०० रूपया पर्यंत भाव मिळत आहे.

 

टॅग्स :Wheatगहूwardha-acवर्धा