जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांना ३० लाखांचा फटका

By Admin | Updated: February 1, 2015 23:00 IST2015-02-01T23:00:52+5:302015-02-01T23:00:52+5:30

नैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीानतेच्या चाकात फसलेल्या शेतकऱ्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात

Wildfires inflict 30 lakhs on farmers | जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांना ३० लाखांचा फटका

जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांना ३० लाखांचा फटका

रूपेश खैरी - वर्धा
नैसर्गिक आपत्ती व शासकीय उदासीानतेच्या चाकात फसलेल्या शेतकऱ्यांना जंगली श्वापदांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागत आहे. डिसेंबर २०१४ अखेर पर्यंत जंगली श्वापदांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे ३० लाख ३४ हजार ११८ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यातील काही शेतकऱ्यांना मदत मिळाली तर काहंीना अद्यापही मदतीची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात बोर अभयारण्य आहे तर जिल्ह्याच्या सिमेवर ताडोबाच्या जंगलाचा काही भाग येत आहे. या जंगलातील श्वापदे अन्नाच्या शोधात येत लगतच्या शेतात धुडगूस घालतात. या श्वापदांकडून शेतातील कोणत्याही एका भागातील पिकाचे नुकसान होते. नुकसान करून पळून जाताना ही श्वापदे शेतातील पूर्ण पिकच तुडवत असल्याचे चित्र आहे. वन विभागाकडून मात्र एकाच भागातील पिकाची पाहणी करून मदत मिळते.
जिल्ह्यात या श्वापदांनी एकूण ४९९ शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त केले. याची पाहणी वनविभागाच्यावतीने करण्यात आली असून काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर काही शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अनुदान नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे.
या वन्य प्राण्यांनी केवळ शेतीचेच नाही तर शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ला चढविला आहे. त्यांनी जिल्ह्यात यंदाच्या सत्रात आतापर्यंत एकूण ९१ जनावरांचा फडशा पाडला आहे. तर १३ व्यक्तींवर हल्ला केला आहे. सुदैवाने यात एकाचाही मृत्यू झाला नाही. या सर्व प्रकरणात वनविभागाच्यावतीने मदत देण्यात असली तरी या मदतीकरिता वनविभागाच्या कार्यालयात चकरा मारणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अशात कधी नियमाची आडकाठी तर कधी अनुदान नसल्याचा रोडा असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव या नुसानीचा सामाना करावा लागत आहे. यावर शासनाच्यावतीे ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Wildfires inflict 30 lakhs on farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.