पत्नीचा अट्टाहास, पतीने केले खल्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:29 IST2018-11-29T23:29:04+5:302018-11-29T23:29:26+5:30

घरगुती कामात व्यस्त असलेल्या पतीकडे मुलीला शाळेत सोडून देण्याचा आग्रह धरणाऱ्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता दरम्यान कारंजा (घाडगे) तालुक्यातील जुनापाणी या गावात घडली.

Wife's stupidity, husband did | पत्नीचा अट्टाहास, पतीने केले खल्लास

पत्नीचा अट्टाहास, पतीने केले खल्लास

ठळक मुद्देकुऱ्हाडीने केला वार : जुनापाणी गावातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : घरगुती कामात व्यस्त असलेल्या पतीकडे मुलीला शाळेत सोडून देण्याचा आग्रह धरणाऱ्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता दरम्यान कारंजा (घाडगे) तालुक्यातील जुनापाणी या गावात घडली.
संध्या केशव भस्मे (३०) रा. जुनापाणी असे मृतक पत्नीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी पती केशव भस्मे (३४) हा घरी शेड बनविण्याच्या कामात व्यस्त होता. तेव्हा मुलीला शाळेत सोडून देण्याकरिता मृतक संध्यांनी त्याच्याकडे आग्रह धरला. त्यामुळे संतापलेल्या केशवने हातची कुऱ्हाड तिच्या डोक्यावर मारली. यात तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने ती धाडकन जमिनीवर कोसळली. आवाज ऐकून लगेच मुलगी धावत आल्यानंतर तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून आरडाओरड केली. लागलीच गावातील नागरिकांनी धाव घेऊन संध्याला कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. रुग्णालयात पोहचण्यापूर्वी वाटेतच तिचा मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. आठ दिवासांपासून संध्याचे वडील तिच्याकडे राहत असून ते घटनेदरम्यान शेताकडे गेले होते. त्यांना कळताच तेही धावत घरी परतले. त्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी केशव याने घटनेनंतर स्वत: पोलीस स्टेशन गाठून हत्येची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक कली असून पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.
रुग्णालयातील कर्मचारी बेपत्ता
संध्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता. मृतदेह रुग्णालयातून शवविच्छेदन गृहापर्यंत व आत नेण्याची सर्व जबाबदारी मृतकाचे वडील व नातेवाईकांनाच पार पाडावी लागली. यावेळी रुग्णालयातील एकाही कर्मचाऱ्याने हातभार लावला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या रुग्णालयातील कर्मचारी आहे, तरी कशाला, असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला.

Web Title: Wife's stupidity, husband did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून