शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

पती-पत्नीच्या सुंदर नात्यात जीवघेणी हिंसा का वाढतेय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:45 IST

घरोघरी वाढताहेत वाद : 'भरोसा'कडे ११ महिन्यांत १,२३१ तक्रारी; ३२ प्रकरणांत विविध ठाण्यात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचारात वाढ होत आहे. किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमध्ये होणारे वाद इतके विकोपाला जात आहेत की, याचे पर्यवसान हाणामारी आणि अगदी खून करण्यामध्ये होत आहे. ही नात्यातील वाढती हिंसा एक चिंतेची बाब बनली असून, पती पत्नीच्या सुंदर नात्यात इतकी हिंसकता येतेच कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे मागील ११ महिन्यांत १,२३१ तक्रारी दाखल असून, ३२ प्रकरणांत विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

एक काळ असा होता की, पुरुषी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किंवा स्वताचे नैराश्य, अपयश लपविण्यासाठी पती आपल्या पत्नीवर हात उगारत असे. दुर्दैव म्हणजे कुटुंबातील सदस्यांना यात वावगे काहीच वाटत नव्हते. कुणी पुरुषाला अडविण्याचा प्रयत्नहीं करीत नव्हता अजूनही ही स्थिती फारशी बदललेली नाही, मात्र आता एकविसाव्या शतकात सबला पत्नीकडूनदेखील क्षुल्लक कारणावरून मागचा-पुढचा विचार न करता पतीला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, विवाहबाह्य संबंधातून खून करणे, असे प्रकार वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

नात्या-नात्यात वाढली धोक्याची घंटा पती गिफ्ट देत नाही. फिरायला नेत नाही. म्हणून दोन वर्षांपूर्वी पत्नीने पतीच्या नाकावर ठोसा मारला होती. दोन दिवसापूर्वीच शहर हद्दीत पत्नीने न सांगता हप्ते भरले म्हणून पत्नीला शिवीगाळ, मारहाण फैल्याची घटना घडली.ज्यांनी एकमेकांसमवेत आयुष्य घालविण्याची स्वप्न रंगवली तेच एकमेकाना दुखापत करायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत, ही नात्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.

महिनानिहाय 'भरोसा'त प्राप्त झालेल्या तक्रारी जानेवारी - ११५फेब्रुवारी - ८९मार्च - १२१एप्रिल - १०१मे - १११जून - १४५जुलै - १४५ऑगस्ट - ११२सप्टेंबर - १०९ऑक्टोबर - १०४नोव्हेंबर - ७९

लग्न, संसार म्हणजे काय? "याच गोही आला पती-पत्नी विसरत चालले आहेत, मी, माझे आणि मला इतकेच त्यांचे नाते व्यावहारिक झाले आहे. मोवाइलमुळे निर्माण झालेल्या मुलांना भोगावा लागत आहे. विसंवादाचा परिणाम लहान पूर्वी कुटुंबातील सवस्य एकत्रित बसून चहा पित असत. आता चहा पितानाही हातात मोबाइल असतो, अशी स्थिती आहे. पती-पत्नीमध्ये भावनिकता राहिलेली नाही." - माधुरी वाघाडे, सहाराक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल

"अनेकदा पती-पत्नीला नात्यात संवादाचा अभाव, विश्वासाचा तुटलेला धागा आणि ताणतणाव यामुळे टोकाच्या घटना घडतात. त्यामागे मानसिक ताण, चिडचिड, किंवा नैराश्य यांचा मोठा वाटा असतो, बायका या पुरुषांना मारत नाहीत है सार्वजनिक सत्य मानणे चुकीचे आहे, कारण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये महिलाही आक्रमक होऊ शकतात. भारतात महिलांसाठी अनेक संरक्षणात्मक कायदे आहेत, जसे घटनेतील कलम ४९८ अ (कॉटुंबिक हिंसेविरुद्ध संरक्षण) परंतु पुरुषांसाठी अशा प्रकारच्या संरक्षणात्मक तरतुदी फारशा उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात महिलांकडून असे प्रकार घडतात." - अॅड. मंजुश्री आसोपा,

१,१९० प्रकरणांचा निपटारा, ४१ प्रकरणे प्रलंबितजिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत तब्बल १,२३१ तक्रारी दाखल आल्या होत्या. यापैकी १,११० प्रकरणांत भरोसा सेलमधील महिला कर्मचाऱ्यांनी पती-पत्नीचे समुपदेशन करून त्यांचा संसार पुन्हा फुलविला, तर ४१ प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा