पांढऱ्या सोन्याचा विक्रम; शुक्रवारी मिळाला १४,४७० भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST2022-05-14T05:00:00+5:302022-05-14T05:00:06+5:30

उपबाजारपेठेत पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाला १४ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. शुक्रवारी या बाजारपेठेत तब्बल ४०० क्विंटल कापसाची आवक झाल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेत रुईच्या दरात तेजी आल्याने त्याचा परिणाम भारतातील कापसाच्या भावावर झाल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. येत्या काळात कापसाच्या भावात आणखी तेजी आल्यास त्याचा सर्वाधिक फायदा व्यापाऱ्यांनाच होणार आहे. 

White gold record; 14,470 on Friday | पांढऱ्या सोन्याचा विक्रम; शुक्रवारी मिळाला १४,४७० भाव

पांढऱ्या सोन्याचा विक्रम; शुक्रवारी मिळाला १४,४७० भाव

प्रफुल्ल लुंगे
लोकमत न्यूज नेटवर्क 
सेलू : मागील दीड महिन्यांपासून १३ हजारांवर स्थिरावलेल्या कापसाने आज चांगलीच उसळी घेतली. सिंदी रेल्वे बाजार समितीची उपबाजारपेठ असलेल्या सेलूत शुक्रवारी तब्बल ४०० क्विंटल कापसाची आवक झाली असून, आज कापसाला विक्रमी म्हणजे ९ हजार ७०० ते १४ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
वर्धा शहरापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर असलेले सेलू हे तालुक्याचे स्थळ आहे. येथे सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ असून, तेथे शेतकरी त्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणतात. कापसाचा हंगाम संपत असतानाच शुक्रवारी या उपबाजारपेठेत पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाला १४ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. शुक्रवारी या बाजारपेठेत तब्बल ४०० क्विंटल कापसाची आवक झाल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेत रुईच्या दरात तेजी आल्याने त्याचा परिणाम भारतातील कापसाच्या भावावर झाल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. येत्या काळात कापसाच्या भावात आणखी तेजी आल्यास त्याचा सर्वाधिक फायदा व्यापाऱ्यांनाच होणार आहे. 

३.३० लाख क्विंटल कापसाची झाली खरेदी
-    १ एप्रिल २०२१ ते १२ मे २०२२ या कालावधीत सेलू उपबाजारपेठेत एकूण तीन लाख ३० हजार ९५२ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. या कापसाची एकूण किंमत २६१,२३,२२,९२० रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले.

मुख्य बाजारपेठ सिंदी तरी मोठी उलाढाल सेलूतच
-    सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीची सेलू ही उपबाजारपेठ आहे. याठिकाणी कापूस तसेच इतर धान्याची मोठी आवक असते. मुख्य बाजारपेठ सिंदी असली तरी सेलू या उपबाजारपेठेत सिंदीच्या तुलनेत अधिक उलाढाल होत असल्याचे वास्तव आहे.

भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच?
-    यंदा दिवाळी तोंडावर असताना कापसाला ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला. नंतर कापसाच्या भावात वेळोवेळी तेजी आल्याने प्रति क्विंटल कापूस १३ हजारांपर्यंत पोहोचला. तर शुक्रवारी सेलू उपबाजारपेठेत कापसाच्या भावाने नवा विक्रमच नोंदवला आहे. सध्या नाममात्र शेतकऱ्यांकडे कापूस असून, या भाववाढीचा सर्वाधिक फायदा व्यापाऱ्यांनाच होणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

Web Title: White gold record; 14,470 on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.