दारूची वाहतूक करताना दारूबंदी अध्यक्षालाच अटक

By Admin | Updated: August 12, 2014 23:55 IST2014-08-12T23:55:00+5:302014-08-12T23:55:00+5:30

महिला दक्षता व दारूबंदी समितीचे अध्यक्षच दुचाकीने दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ यावरून जाम येथे त्यास पकडण्यात आले़ यात दुचाकी व दारू असा २

While transporting liquor, the president of the liquor baron was arrested | दारूची वाहतूक करताना दारूबंदी अध्यक्षालाच अटक

दारूची वाहतूक करताना दारूबंदी अध्यक्षालाच अटक

समुद्रपूर : महिला दक्षता व दारूबंदी समितीचे अध्यक्षच दुचाकीने दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ यावरून जाम येथे त्यास पकडण्यात आले़ यात दुचाकी व दारू असा २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला़
दारूबंदी समितीचे अध्यक्ष रामकृष्ण गजभिये हे दुचाकी एम़ एच़ ३२-७६२९ ने दारू आणत असल्याची माहिती मिळाली. यावरून जाम येथे त्यास अडविण्यात आले़ त्याच्याकडून डिप्लोमॅट कंपनीची दारू व दुचाकी असा २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गजभिये अवैध दारू विक्रेत्यांना प्रोत्साहन देत त्यांच्याकडून हप्ते वसुली करीत होते़ पोलिसांनी त्याच्या खिशाला असलेले समितीचे कार्ड जप्त केले. ही कारवाई ठाणेदार अनिल जिट्टावार, पोलीस उपनिरीक्षक जवंजाळ, उमेश हरणखेडे यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: While transporting liquor, the president of the liquor baron was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.