जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST2022-01-03T05:00:00+5:302022-01-03T05:00:11+5:30
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नाममात्र प्रमाणात का होई ना पण नवीन कोविडबाधित सापडत असल्याने जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा हा जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता? नेमका कोणता? याविषयी नुकत्याच झालेला टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कोविड बाधितांचे स्वॅब जीन तपासणीसाठी पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.

जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शारदीय नवरात्रोत्सवाच्या द्वितीय दिवशी कोविडमुक्त झालेल्या वर्धा जिल्ह्यात दिवाळीनंतर कासवगतीने कोविड पाय पसरवित आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोविडच्या ओमायक्रॉन या जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता? यामुळे समाजातील सर्वच घटकात दहशतीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नाममात्र प्रमाणात का होई ना पण नवीन कोविडबाधित सापडत असल्याने जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा हा जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता? नेमका कोणता? याविषयी नुकत्याच झालेला टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कोविड बाधितांचे स्वॅब जीन तपासणीसाठी पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.
आठ दिवसांत जिल्ह्यात सापडले दहा नवीन कोविड बाधित
- मागील आठ दिवसांत जिल्ह्यात तब्बल दहा नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता ४९ हजार ४४१ झाली आहे. जिल्ह्यात सध्या दहा ॲक्टिव्ह कोविडबाधित असून, एकूणच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्ग कासवतीने आपले पाय पसरवित असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
कोविडचा प्रभाव कमी करण्यासाठी लस उपयुक्त
- ओमायक्रॉनमुळे शासन व प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ओमायक्रॉनमुळेच कोविडची तिसरी लाट ओढावण्याची शक्यता असून खबरदारीचे उपाय सध्या जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहेत.
- असे असले तरी लाभार्थ्यांना देण्यात येणारी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस काेविड मृत्यू रोखण्यासह ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात अजूनही ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला नसला तरी जिल्ह्यावर ओमायक्राॅनचे संकट आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घ्यावी. लसीमुळे मनुष्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढत असून, ती कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्तच आहे.
- नितीन गगने, अधिष्ठाता, कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम.