कुठे पोलीस बंदोबस्त तर कुठे हमरीतुमरी

By Admin | Updated: August 17, 2014 23:20 IST2014-08-17T23:20:25+5:302014-08-17T23:20:25+5:30

येथील ग्रा़पं़ कार्यालयासत ग्रामसभा पार पडली़ सभेला तरुणांची उपस्थिती होती़ मागील वर्षीच्या अतिवृष्टीत जमीन खरडून गेल्याच्या अनुदानातील घोळाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला़ यातील

Where the police settlement and where we were | कुठे पोलीस बंदोबस्त तर कुठे हमरीतुमरी

कुठे पोलीस बंदोबस्त तर कुठे हमरीतुमरी

रोहणा : येथील ग्रा़पं़ कार्यालयासत ग्रामसभा पार पडली़ सभेला तरुणांची उपस्थिती होती़ मागील वर्षीच्या अतिवृष्टीत जमीन खरडून गेल्याच्या अनुदानातील घोळाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला़ यातील यादीत घोळ करून निधीचा अपहार केल्याचा आरोप केला़ याबाबत तहसीलदार आर्वी यांना तक्रार केली असून अपहार प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व खऱ्या लाभार्थ्यांना अनुदान मिळावे, असा ठराव मंजूर करण्यात आला़
नियोजित विषय संपल्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या यादीत घोळ झाल्याचा मुद्दा शेतकरी व युवकांनी मांडला़ यातील याद्या दाखवून घोळ लक्षात आणून दिला़ नदी काठापासून लांब शेत, नावे जमीन नाही अशा शेतकऱ्यांची नावे यादीत टाकून लाभ दिला़ याबाबत कृषी सहायक पाटील यांनी सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. त्यात ही नावे नव्हती़ ती खोडतोड करून टाकल्याचे सांगितले; पण ती कुणी टाकली हे माहिती नसल्याचे सांगितले़ तलाठी आंबेकर सभेला अनुपस्थित होते़ वादळी चर्चेनंतर चौकशीचा ठराव पारित झाला़ शिवाय नुकसान नसताना अनुदान उचललेल्यांकडून ती रक्कम वसूल करावी, असा ठरावही घेण्यात आला़ जिल्हाधिकाऱ्यांना ठरावाच्या प्रती पाठविण्याची सूचनाही ग्रामसभेने केली़ प्रकरणाची दखल घेतली जाते काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Where the police settlement and where we were

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.