शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन सावधान; तर आपल्यावरच होईल कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

वादग्रस्त आणि अफवा पसरविणारे मेसेज रोखणे ही आता व्हॉट्सॲप ॲडमिनचीच जबाबदारी राहणार आहे. आता केवळ ग्रुप तयार करुन ॲडमिन म्हणून मिरविण्याचे दिवस गेले आहेत. ॲडमिन होण्याबरोबरच आता मोठी जबाबदारीही अंगावर येऊन पडली आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गजाआड जाण्याची वेळ येऊ शकते. कोणत्याही व्हाॅट्सॲप ग्रुपवर धर्म, राष्ट्रीयत्व, वंश, भाषा आदी कारणांनी वैरभाव वाढवू शकेल, अशी कोणतीही पोस्ट पाठवता येणार नाही. 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वाधिक आवडीचे समाजमाध्यम व्हॉट्सॲपद्वारे कोरोनाबाबत अफवाही पसरविण्यात येत असून, त्या रोखण्यासाठी राज्य पोलीस दलातील सायबर सेलने उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे वर्धा सायबर सेलचा आता सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर वॉच राहील. एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जातीय तेढ, अफवा अथवा आक्षेपार्ह मेसेज आल्यास ग्रुप ॲडमिनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वादग्रस्त आणि अफवा पसरविणारे मेसेज रोखणे ही आता व्हॉट्सॲप ॲडमिनचीच जबाबदारी राहणार आहे. आता केवळ ग्रुप तयार करुन ॲडमिन म्हणून मिरविण्याचे दिवस गेले आहेत. ॲडमिन होण्याबरोबरच आता मोठी जबाबदारीही अंगावर येऊन पडली आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गजाआड जाण्याची वेळ येऊ शकते. कोणत्याही व्हाॅट्सॲप ग्रुपवर धर्म, राष्ट्रीयत्व, वंश, भाषा आदी कारणांनी वैरभाव वाढवू शकेल, अशी कोणतीही पोस्ट पाठवता येणार नाही. देशद्रोही, जातीयवाद किंवा वर्णद्वेष पसरवणारे मेसेज टाकल्यास तो गुन्हा ठरणार आहे. व्हॉट्सॲप ॲडमिनलाच आपल्या ग्रुपमधील सदस्यांना लगाम घालावा लागणार आहे. ग्रुपमधील सदस्यांकडून असा प्रकार घडल्यास पोलिसांना कळविणे हे त्याचे कर्तव्य असणार आहे. कोणाचीही बदनामी होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

कारवाईची तरतूद अशीधार्मिक भावना भडकवणारे अथवा आक्षेपार्ह संदेश पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात दंडासह पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. राष्ट्र किंवा व्यक्तीविरुद्ध द्वेष पसरविल्याप्रकरणी भादंविच्या कलम १५३ ब नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. कोणताही धर्म अथवा जातीविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास कलम २९५ अन्वये गुन्हा  दाखल होऊ शकतो. अफवा पसरवणारे संदेश पोस्ट करणाऱ्याविरुद्ध कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. यात एका वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे.

ॲडमिन आहात, ही काळजी घ्याचव्हॉट्सॲप ॲडमिनने आपल्या ग्रुपमधील प्रत्येक सभासद हा विश्वासार्ह आहे, ही काळजी घेण्याची गरज आहे. गैर वागणाऱ्या सदस्यांबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देण्याची गरज आहे. व्हॉट्सॲप ॲडमिनने आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना या संदर्भातील कायदा आणि नियमांची माहिती द्यायला हवी. तसा मेसेज ग्रुपवर टाकायला हवा. ॲडमिनने सातत्याने ग्रुपवर काय प्रकारचा मजकूर प्रसारित होत आहे, याची काळजी घ्यायला हवी.

फॉरवर्ड करताय, काळजी घ्यावी!कोणताही मेसेज, फोटो, ऑडिओ क्लीप व व्हिडीओ एका ग्रुपवरुन दुसऱ्या ग्रुपवर किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे व्हायरल करत असाल तर तुम्हाला अधिक खबरदारी घ्यावी लागेल. चुकून एखादी आक्षेपार्ह पोस्ट पूर्ण न वाचता किंवा त्याचा अर्थ समजला नाही तरी फाॅरवर्ड केलीत तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो.

वर्धा सायबर सेलचे लक्ष-  कोणत्याही सदस्याला ग्रुपमध्ये जोडताना त्याची विश्वासार्हता तपासणे बंधनकारक आहे. ग्रुपमध्ये येणाऱ्या प्रत्येक संदेशावर ॲडमिनने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. -   सदस्य सूचनेकडे दुर्लक्ष करत असल्यास ‘ओन्ली फॉर ॲडमिन’ अशी सेटींग करावी. आक्षेपार्ह संदेश अथवा अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार करावी. -   आता जातीय तेढ, धार्मिक भावना भडकविणाऱ्यांवर वर्धा सायबर सेल बारीक लक्ष ठेवून आहे.  

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप