शस्त्राने भोसकून वृद्धाची हत्या

By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-14T01:19:11+5:302014-06-14T01:19:11+5:30

अंगणात झोपून असलेल्या एका वयोवृद्ध इसमाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

Weapons killed the old man | शस्त्राने भोसकून वृद्धाची हत्या

शस्त्राने भोसकून वृद्धाची हत्या

  शिरपूर (होरे) : अंगणात झोपून असलेल्या एका वयोवृद्ध इसमाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. पहाटे वृद्धाची सून सडा टाकण्यासाठी अंगणात आली असता तिला रक्ताच्या थारोळ्यात वृद्धाचा मृतदेह खाटेवर आढळून आला़ ही हृदयद्रावक घटना येथे गुरूवारी रात्री घडली़ या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे़ शंकर भीवाजी थूल (७०) रा शिरपूर (होरे) असे मृतकाचे नाव आहे़ शंकर थूल हे गुरूवारी रात्री अंगणात झोपले होते; पण पहाटे शस्त्राने वार केलेला मृददेहच आढळून आला़ त्यांच्या डोक्यावर, मानेवर व अन्य अवयवांवरही जखमा दिसून आल्या़ ही हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा उलगडा होऊ शकला नाही़ यात देवळी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नावे कळू शकली नाही़ पूढील तपास देवळी पोलीस करीत आहेत़(वार्ताहर)

Web Title: Weapons killed the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.