शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

धोंडी-धोंडी पाणी दे ; धान-कोंडा पिकू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:34 PM

लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : जून महिना संपत आला तरीही पावसाचा थांगपत्ता नसल्याने परिसरात पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. ...

ठळक मुद्देपावसासाठी घरोघरी जाऊन जागर : खासदार कुटुंबीयांचे निसर्गाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : जून महिना संपत आला तरीही पावसाचा थांगपत्ता नसल्याने परिसरात पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. शहर व ग्रामीण भागातील नळयोजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, गावातील सार्वजनिक विहिरी आणि विंधन विहिरींनीही तळ गाठला असून नदीचे पात्र कोरडे पडले आहे. अशा स्थितीत पाण्याअभावी विवंचना वाढल्याने गावोगावी नागरिकांनी निसर्गाची आराधना करायला सुरुवात केली आहे.देवळी येथील नागरिक शहराच्या कानाकोपºयात धोंडी फिरवून जागर करित आहे. ‘धोंडी-धोंडी पाणी दे, धान-कोंडा पिकू दे’ अशा प्रकारची आर्त हाक देवून वरूणराजाचे मन वळविले जात आहे. यासाठी कंबरेच्या भोवताल निंबाचा पाला गुंडाळून नाचत घरोघरी जाणारी मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच काही ठिकाणी जेवनाच्या पंगतीचे आयोजन करुन निसर्गाची याचना केली जात आहे. खासदार रामदास तडस यांचे कुटुंबीय आणि नालवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्यावतीनेही वर्ध्यातील खासदारांच्या निवासस्थानालगतच्या सार्वजनिक व्यायामशाळेच्या प्रांगणात जेवणाच्या पंगती उठवून अन्नदान करण्यात आले. ‘धोंडी-धोंडी पाणी दे’ म्हणत निसर्गाला पाण्यासाठी हाक देण्यात आली.यासाठी तडस कुटूंबायातील नालवाडी ग्रा.पं.सदस्य सुनीता मेहरे व मनीषा शेंडे यांनी पुढाकार घेतला. या भागातील जि.प.सदस्य, सरपंच व सदस्यांसह खासदारांचे स्वीय सहाय्यक विपिन पिसे, सुनील राऊत, गजानन जाणवे व नागरिकांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Rainपाऊस