पाच दिवसानंतर वर्धेकरांना मिळणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:29+5:30
रस्त्याचे बांधकामासाठी खोदकाम करतांना नालवाडी परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यासोबत आणखी तीन ठिकाणी जलवाहिनी क्षतीग्रस्त झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाल्याने त्यांच्याकडून काही नुकसान भरपाई घेत नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कामाला सुरुवात केली.

पाच दिवसानंतर वर्धेकरांना मिळणार पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रस्ता बांधकामात शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर काम करुन मुख्यजलवाहिनीसह अन्य तीन ठिकाणची दुरुस्ती केली. त्यामुळे आता वर्धेकरांना सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
रस्त्याचे बांधकामासाठी खोदकाम करतांना नालवाडी परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यासोबत आणखी तीन ठिकाणी जलवाहिनी क्षतीग्रस्त झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाल्याने त्यांच्याकडून काही नुकसान भरपाई घेत नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कामाला सुरुवात केली. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीकरिता २ लाख ३६ हजार रुपयाचा खर्च करुन दुरुस्त करण्यात आली. त्यामुळे स्नेहलनगर, आनंदनगर, लक्ष्मीनगर व सिव्हिल लाईन परिसर वगळता इतर सर्व परिसरात रविवारी पाणीपुरवठा करण्यात आला. आता इतर तीन ठिकाणच्या दुरुस्तीवर जवळपास ३७ हजार रुपयांचा खर्च करुन ते कामही पूर्ण केले आहे.
त्यामुळे सोमवारपासून शहरातील सर्वच परिसरात सुरळीत पाणीपुरवठा केल्या जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता निलेश नंदनवार यांनी सांगितले. या कामासाठी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सुजीत भोसले व किशोर मेहरकुरे व कंत्राटदार टिपन्ना भंडारी यांनी परिश्रम घेतले.