वर्धा रेल्वेस्थानक सीसीटीव्हीच्या निगरानीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:19+5:30
मुख्य रेल्वेस्थानकावर कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रणालीअंतर्गत ३८ पूर्ण एचडी (हाय डेफिनेशन) कॅमेऱ्यांचा समावेश आहे. यातील २६ बुलेट प्रकारातील ४ बाय ४ रिझॉल्युशनयुक्त असून प्रवेशस्थळी आणि बाह्यपरिसरात लावण्यात आले आहेत. फलाट, ओव्हरब्रीज आदीसाठी पाच डोम कॅमेरे आणि यातीलच काही कॅमेरे वाहनतळाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. ही प्रणाली मध्य रेल्वेच्या अमरावती, अहमदनगर, बऱ्हाणपूर, खंडवा आदी रेल्वेस्थानकांवरदेखील कार्यान्वित करण्यात आली आहे.

वर्धा रेल्वेस्थानक सीसीटीव्हीच्या निगरानीत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महिलांच्या सुरक्षेसोबतच गुन्हेगारीवर वॉच ठेवण्याकरिता मुख्य रेल्वेस्थानकावर व्हिडिओ निगरानी प्रणाली (व्हीएसएस) कार्यान्वित करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्भया निधीचा याकरिता उपयोग करण्यात आला आहे. यामुळे मुख्य रेल्वेस्थानक आता आयपी आधारित सीसीटीव्हीच्या निगरानीत आले आहे.
मुख्य रेल्वेस्थानकावर कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रणालीअंतर्गत ३८ पूर्ण एचडी (हाय डेफिनेशन) कॅमेऱ्यांचा समावेश आहे. यातील २६ बुलेट प्रकारातील ४ बाय ४ रिझॉल्युशनयुक्त असून प्रवेशस्थळी आणि बाह्यपरिसरात लावण्यात आले आहेत. फलाट, ओव्हरब्रीज आदीसाठी पाच डोम कॅमेरे आणि यातीलच काही कॅमेरे वाहनतळाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. ही प्रणाली मध्य रेल्वेच्या अमरावती, अहमदनगर, बऱ्हाणपूर, खंडवा आदी रेल्वेस्थानकांवरदेखील कार्यान्वित करण्यात आली आहे.
रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षात या कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण सुरू आहे. रेल्वेस्थानक परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून कॅमेरे नेटवर्कशी संलग्न केले जाणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज केंद्रीकृत सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाºयांना पाहता येणार असून यामुळे रेल्वेस्थानकावर असामाजिक प्रवृत्तींना लगाम लागणार आहे.
याशिवाय रेल्वेस्थानकावर रेलटेलद्वारे १६ एक्सेस पॉइंट असलेली अत्याधुनिक वाय-फाय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने रेलटेलला रेल्वेस्थानकांसोबतच प्रीमिअम आणि ईएमयू कोचेसमध्ये व्हिडिओ अॅनालिटिक्स ऑफ फेशियल रिकग्निशन प्रणाली असलेली आयपी आधारित व्हिडिओ सर्व्हेलन्स प्रणाली उपलब्ध करण्याचे काम सोपविले आहे.
रेल्वेस्थानकाच्या विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणाचे बहुतांश काम पूर्णत्वास गेले आहे. नवे तिकीटघर प्रवाशांना भुरळ घालत असून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात रेल्वे बोर्ड हायटेक होत असून या विभागाचे पाऊल पुढे पडतेच असेच आहे.
महिला, तरुणी अत्याचार, बालकांचे अपहरण व अन्य गुन्ह्यांची प्रकरणे लक्षात घेता सुरक्षेच्या अनुषंगाने रेल्वेथानकावर ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे. अन्य रेल्वेस्थानकांवर लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
संजीव मित्तल, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
रेल्वेस्थानकांवर व्हिडिओ निगरानी प्रणाली कार्यान्वित करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात देशातील २०० रेल्वेस्थानकांवर काम सुरू आहे. यातील ८० रेल्वेस्थानकांवर काम पूर्णत्वास गेले आहे. स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांच्या माध्यमातून ३० दिवसांकरिता फुटेज, व्हिडिओ संग्रहित केले जाणार आहेत. या प्रणालीमुळे रेल्वेस्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षादेखील शक्य होणार आहे.
पुनीत चावला, अध्यक्ष, रेलटेल कार्पोरेशन