लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: अट्टल चोर लड्डू उर्फ यश अमन पुणेकर (१९) रा. गोधनी, याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. लड्डूने यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव व नागपूर जिल्ह्यातील एका गुन्ह्याची कबुली पोलिसांजवळ दिली आहे. त्याच्याकडून चोरीचा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वर्ध्यात संशयास्पद हालचाली करीत असलेल्या लड्डूला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने केलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक एलईडी, लॅपटॉप, कारसह एकूण ४ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इंगळे, मोरखडे, दरगुडे, लामसे, बुरंगे, बन्सोड, खडसे, इप्पर, जैशिंगपूरे, बावनकर आदींनी केली.
वर्ध्यातील अट्टल चोर ‘लड्डू’ पोलिसांच्या तावडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:43 IST
अट्टल चोर लड्डू उर्फ यश अमन पुणेकर (१९) रा. गोधनी, याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले.
वर्ध्यातील अट्टल चोर ‘लड्डू’ पोलिसांच्या तावडीत
ठळक मुद्देएलसीबीची कारवाईनागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील गुन्ह्यांची कबुली