शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-नागपूर मार्ग ठरतोय अपघात मार्ग

By admin | Updated: August 31, 2015 01:57 IST

वर्धा- नागपूर महामार्ग हा राज्य क्रमांक ३ चा महामार्ग आहे. परंतु सध्या या मार्गाची दुरवस्था झाली असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

सेलूत तहसीलदारांना साकडे : समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारावर्धा : वर्धा- नागपूर महामार्ग हा राज्य क्रमांक ३ चा महामार्ग आहे. परंतु सध्या या मार्गाची दुरवस्था झाली असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता सेलूच्या वीर भगतसिंह संस्थेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत रस्त्यासंबंधी असलेल्या समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन देण्यात आले. राज्य महामार्ग असलेल्याा या रस्त्याची अवस्था सध्या एखाद्या पायरस्त्याप्रमाणे झाली आहे. यावर वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे राज्य पसरले आहे. यामुळे हा रस्ता आता जीवघेणा ठरत आहे. दळण-वळणाचा एक प्रमुख मार्ग असून म्हणून या रस्त्याची नोंद आहे. त्याच कारणाने या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यात हा फक्त एकपदरी मार्ग असल्याने लहान पासून ते जड वाहनापर्यंतच्या वाहतुकीमुळे नागरिकांना नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे. शाळा, महाविद्यालये यातील मुले आणि नोकरीसाठी ये-जा करणाऱ्यांकरिता हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. या रस्त्यावरून अनेक नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचा आरोप भगतसिंह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात मार्गावर रोज एक ना एक अपघात होणे ही बाब नित्याचीच झाली आहे. आतापर्यंत कित्येकांनी या मार्गावर आपले प्राण गमविले आहे. सेलूनजीक मार्गावर पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात येत आहे. यात पुन्हा त्याची अवस्था जशीच्या तशी होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराकडे संपूर्णत: प्रशासन तसेच संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आणि प्रशासनास जागे करण्यासाठी वीर भगतसिंह ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलूने एक पाऊल उचलत तहसील कार्यालयाला याबाबत निवेदन दिले. या प्रकरणाचे लवकरात लवकर निवारण करण्याचे आश्वासन तहसीलदार सेलू यांनी संस्थेच्या अध्यक्षाला दिले. या समस्येचे योग्य ते निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विर भगतसिंह ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलूच्या सदस्यांकडून करण्यात आला. निवेदन देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत नाईकवाडे तसेच विकास मोरमवार, निसार सैय्यद, करन धनुले, सुरज वैद्य, शिवा डुकरे, मनीष खंडाळकर, सागर डाखोळे, रोशन तळवेकर, विशाल सावरकर, स्वप्नील तिजारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)