शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

औषधी प्रकरणात कदम दाम्पत्य पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 12:59 IST

न्यायालयीन कोठडीत असलेले डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोटेक्शन वॉरंटवर सखोल चौकशी करण्याकरिता पुन्हा ताब्यात घेतले असून, अवैध शासकीय औषधसाठा प्रकरणात अटक केली आहे.

ठळक मुद्देअवैध गर्भपात प्रकरण : १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

राजेश सोळंकी/पुरुषोत्तम नागपुरे

देऊरवाडा/आर्वी (वर्धा) : अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. रेखा कदम आणि सहआरोपी डॉ. नीरज कदम यांना शासकीय रुग्णालयातील औषधांच्या अवैध साठाप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी पुन्हा ताब्यात घेतले. त्यांना चौकशीकरिता आर्वीत आणल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, विशेष जिल्हा सत्र न्यायाधीशांसमक्ष हजर केले असता, त्यांनी कदम दाम्पत्याला १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कदम हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शैलजा कदम आणि डॉ. कुमारसिंह कदम यांना १४ फेब्रुवारीपर्यंत उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणावर पोलिसांना आपले म्हणणे मांडायचे होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक वंदना सोनोने आणि मदतगार इम्रान खिल्ची यांनी ९ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात म्हणणे (से) मांडले.

न्यायालयीन कोठडीत असलेले डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोटेक्शन वॉरंटवर सखोल चौकशी करण्याकरिता पुन्हा ताब्यात घेतले असून, अवैध शासकीय औषधसाठा प्रकरणात अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, ठाणेदार भानुदास पिदुरकर, सहायक पोलीस निरीक्षक वंदना सोनोने, पाेक्साे सेलच्या पोलीस उपनिरीक्षक जोत्स्ना गिरी व डी. बी. पथकाने हॉस्पिटलची झाडाझडती घेतली होती. त्यामध्ये पोलिसांना ९७ लाखांची रोकड, काळविटाची कातडी व शासकीय रुग्णालयात वापरणाऱ्या ९० पिटोसीन इंजेक्शन, ७१ हजार ७७२ गर्भनिरोधक गोळ्यांचा साठा आढळून आला होता.

औषधी अपहारात कोण गळाला लागणार?

कदम दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत असल्याने अवैध शासकीय औषधीचा तपास थांबला होता. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी न्यायालयाकडे अर्ज करून या दोघांचा प्रोटेक्शन वॉरंट मागितला होता. न्यायालयाने तो मान्य केल्यामुळे त्यांना चौकशीसाठी आर्वीत आणण्यात आले. विशेष जिल्हा सत्र न्यायाधीशांनी १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यामुळे औषधी अपहार प्रकरणाच्या चौकशीत आणखी कोणते कर्मचारी पोलिसांच्या गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरArrestअटकPoliceपोलिसAbortionगर्भपातHealthआरोग्यmedicineऔषधं